ग्रामपंचायतींसाठी १८ कोटींचा निधी
By Admin | Published: March 13, 2017 02:21 AM2017-03-13T02:21:38+5:302017-03-13T02:21:38+5:30
वाशिम जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींना होणार लाभ.
वाशिम, दि. १२- शासनाने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतींना थेट निधी देण्याचे धोरण अवलंबिले असून, वाशिम जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींसाठी दुसर्या टप्प्यातील १८ कोटींचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला. या निधीचे लवकरच ग्रामपंचायतींना वितरण केले जाणार आहे.
ह्यआमचं गाव -आमचा विकासह्ण या उपक्रमांतर्गत शासनाने थेट ग्रामपंचायतींना निधी देण्याचे धोरण अंमलात आणले आहे. लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या आधारावर पुढील चार वर्षे ग्रामपंचायतींना १४ व्या वित्त आयोगातून भरघोष निधी मिळणार आहे. हा निधी कोणत्या बाबींवर खर्च करावा, यासाठी सन २0१६ मध्ये जून व जुलै महिन्यात गावनिहाय बैठका, सभा घेऊन ग्रामस्थांच्या सहकार्यातून कृती आराखडे बनविण्यात आले. आराखडा तयार करण्यासाठी ग्रामपंचायतींना मदत म्हणून जिल्ह्यात मास्टर ट्रेनरच्या नियुक्त्याही केल्या होत्या. ग्रामसभेने कृती आराखडा मंजूर केल्यानंतर निधीेंचे प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात आले. सन २0१६-१७ या आर्थिक वर्षात पहिल्या टप्प्यात ४९१ ग्रामपंचायतींना १८ कोटी रुपयांचा निधी यापूर्वीच वाटप करण्यात आले. दुसर्या टप्प्यातील १८ कोटी रुपयांच्या निधीची प्रतीक्षा होती. हा निधी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्राप्त झाला असून, लवकरच या निधीचे ग्रामपंचायतींना वितरण केले जाणार आहे, असे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले. सन २0१५-१६ या वर्षात ४९१ ग्रामपंचायतींना २६ कोटी रुपयांच्या निधीचे थेट वाटप केले होते. ग्रामसभेने मंजुरात दिलेल्या कृती आराखड्यातील कामांवर हा निधी खर्च करावा लागणार आहे. १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतींचे आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण करण्यासाठी लाखो रुपयांचा हा निधी ग्रामपंचायतींना थेट पुरविला जात आहे. या निधी खर्चाचे लेखा परीक्षणही ग्रामपंचायतींना करावे लागणार आहे.