१८ कार्यालयाचे प्रस्ताव तात्काळ पाठवा

By admin | Published: December 11, 2014 12:21 AM2014-12-11T00:21:56+5:302014-12-11T00:21:56+5:30

मुख्यमंत्र्यांचे अधिका-यांना निर्देश; वाशिम जिल्हयाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा.

18 Offer immediate office proposal | १८ कार्यालयाचे प्रस्ताव तात्काळ पाठवा

१८ कार्यालयाचे प्रस्ताव तात्काळ पाठवा

Next

वाशिम : वाशिम जिल्ह्याच्या निर्मितीला तब्बल १६ वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लोटला तरी मुख्यालयी अद्याप १८ कार्यालये नाहीत. या प्रशासकीय बाबींकडे सातत्याने दुर्लक्ष झाले आहे. बुधवारी विधीमंडळ अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांनी वाशिम जिल्हयाचा आढावा घेऊन अधिकार्‍यांना १८ कार्यालयाचे प्रस्ताव तात्काळ पाठवण्याचे निर्देश दिले.
बुधवारी आढावा बैठकीत भंडारा जिल्ह्यापासून सुरूवात करण्यात आली. या आढाव्यामध्ये दुष्काळ, पाणी टंचाई याबाबत विस्तुत चर्चा करण्यात आली. वाशिम जिल्हयाचा आढावा घेताना मुख्यमंत्र्यांनी जिल्हयातील उपस्थित जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांच्यासह विविध विभागातील अधिका-यांना जिल्हयात ज्या कार्यालयासाठी जागा नाही जे भाडयांच्या जागेत आहेत अशा कार्यालयांसाठी आपल्याकडे जागा उपलब्ध आहे . त्यासाठी तात्काळ प्रस्ताव पाठवा असे निर्देश दिले. प्रस्ताव पाठविल्याबरोबर ते मंजुर करून घेवू असेही त्यांनी सांगितले.
अकोला दरबारातून प्रशासनाचा गाडा हाकताना काही तालुक्यावर होणारा अन्याय, त्यातूनच विकासाचा वाढलेला अनुशेष, कारभार्‍यांची कार्यप्रणालीवरील सैल झालेली पकड आणि परिणामी सामान्य माणसांची होणारी होरपळ, याप्रश्नाची दखल यावेळी मुख्यमंत्र्यांनी घेतली. यामुळे वाशिम जिल्ह्याची प्रशासकीय कामात गती येणार असल्याची आशा दिसत आहे.

Web Title: 18 Offer immediate office proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.