वाशिम जिल्ह्यातील १.८५ लाख शेतकरी कर्जमाफीच्या कक्षेत
By admin | Published: June 6, 2017 07:39 PM2017-06-06T19:39:19+5:302017-06-06T19:39:19+5:30
वाशिम: मुख्यमंत्र्याच्या घोषणेनुसार प्रत्यक्षात कर्जमाफी झाल्यास वाशिम जिल्ह्यातील १ लाख ८५ हजार ५४४ शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुख्यमंत्र्याच्या घोषणेनुसार प्रत्यक्षात कर्जमाफी झाल्यास वाशिम जिल्ह्यातील १ लाख ८५ हजार ५४४ शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकतो.
शासनाच्या धोरणाविरोधात शेतकऱ्यांनी १ जूनपासून संप पुकारला असताना पाच एकर शेती असलेल्या आणि कर्जथकित असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवार 3 जून रोजी केली. त्या अनुषंगांने प्रशासनाकडून अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जिल्हानिहाय याद्या मागविण्यात येत आहेत. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेतली असता जिल्ह्यातील सहाही तालुक्यात मिळून एकूण १ लाख ८५ हजार ५५४ अल्भूधारक शेतकरी असल्याचे आणि त्या सर्वांची मिळून २ लाख २६ हजार ८०३.८० आर हेक्टर जमिन असल्याचे स्पष्ट झाले आहे.