शाळा निर्जंतुकीकरणासाठी मिळाला १.९ कोटींचा निधी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:20 AM2021-01-24T04:20:17+5:302021-01-24T04:20:17+5:30
वाशिम : इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग बुधवार (दि. २७)पासून सुरू होणार असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी ...
वाशिम : इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग बुधवार (दि. २७)पासून सुरू होणार असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सादील निधीमधून शाळा स्तरावर १.९ कोटींचे वितरण केले. २६ जानेवारीपर्यंत सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचनाही मुख्याध्याकांना व शालेय व्यवस्थापन समितीला दिल्या.
ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख खाली आल्याने नोव्हेंबर महिन्याच्या २३ तारखेला इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. जिल्ह्यात पाचवी ते आठवीपर्यंत शिक्षण देणाऱ्या एकूण ७१४ शाळा असून, येथे ८२ हजार ६६६ विद्यार्थी संख्या आहे. शाळा सुरू करण्याची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात असून, कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळांचे निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या. निधीअभावी निर्जंतुकीकरण रखडले होते. शाळास्तरावर सादील निधीमधून निर्जंतुकीकरण, स्वच्छता करण्यासाठी शिक्षण विभागाने १.९ कोटींचे वितरण केले असून, शाळांचे निर्जंतुकीकरण केले जात आहे.
००००००००००
सादिल निधीस पात्र एकूण शाळा
शाळेचा संवर्ग शाळा
जिल्हा परिषद, नगर परिषद ३०१
शासकीय माध्यमिक शाळा ०९
०००००
विद्यार्थी पटसंख्येनुसार सादिल निधी
विद्यार्थी पटसंख्येनुसार शाळांना सादिल निधी मिळत असतो. पटसंख्येनुसार १० हजार, २५ हजार आणि ५० हजार रुपये निधी मिळतो. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पटसंख्येनुसार शाळा स्तरावर निधी वितरित केला आहे.
0000
जिल्हा परिषद, नगर परिषद शाळांचे निर्जंतुकीकरण होण्यासाठी १ कोटी ९ लाखांचे वितरण शाळा स्तरावर करण्यात आले. पटसंख्येनुसार सादिल निधी देण्यात आला आहे. २६ जानेवारीपूर्वी सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना शाळा प्रशासनाला दिल्या.
- अंबादास मानकर
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)