१९ लाखांचा गुटखा पकडला! आरोपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 02:23 AM2017-08-14T02:23:42+5:302017-08-14T02:23:50+5:30
वाशिम: मिळालेल्या गुप्त माहितीवरून ग्रामीण पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने वाशिम-शेलू रस्त्यावर नाकाबंदी करून दोन वाहनांसह १९ लाख ४ हजार ८00 रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. ही कारवाई १३ ऑगस्टला सकाळी ७ वाजता करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क

याबाबत प्राप्त माहितीनुसार, वाशिम-शेलू रस्त्याने एमएच ३७ जे १४१७ आणि एमएच ३0 पी ३८३२ अशा क्रमांकांच्या दोन वाहनांमधून गुटख्याची अवैधरीत्या वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून ग्रामीण ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी विशेष पथक गठित करून १३ ऑगस्टला सकाळी ब्राह्मणवाडा फाट्यानजिक नाकाबंदी करून, दोन्हीही वाहनांची झाडाझडती घेतली असता, त्यात विमल आणि नजर या कंपनीचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी वाहनचालक संतोष निंबाळकर आणि अमोल राजगुरू या दोघांवर गुन्हे दाखल केले असून, दोन्ही वाहनांसह गुटखा जप्त केला. हे प्रकरण अन्न व औषध प्रशासनकडे वर्ग करण्यात आले आहे.