पहिली  ते  दहावीतील पटसंख्या ७६५ ने  घटली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 11:23 AM2020-12-15T11:23:24+5:302020-12-15T11:23:34+5:30

Washim News पहिली ते दहावीतील विद्यार्थी पटसंख्या जवळपास ७६५ ने कमी झाल्याचे दिसून येते.

1st to 10th grade dropout dropped by 765! | पहिली  ते  दहावीतील पटसंख्या ७६५ ने  घटली!

पहिली  ते  दहावीतील पटसंख्या ७६५ ने  घटली!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :  यंदा कोरोनामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया प्रभावित झाली आहे. कोरोनामुळे कामगार, मजूर हे आपापल्या गावी परतले. यापैकी काहींच्या पाल्यांनी त्यांच्या स्वजिल्ह्यातच प्रवेश घेतले, तर जिल्ह्यातील काही पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश खासगी शाळेत घेतला. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा पहिली ते दहावीतील विद्यार्थी पटसंख्या जवळपास ७६५ ने कमी झाल्याचे दिसून येते.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या जवळपास ७७९ शाळा आहेत. जिल्हा परिषद शाळेत पुरेशा प्रमाणात भाैतिक सुविधा उपलब्ध करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे तसेच नानाविध उपक्रम राबवून शैक्षणिक दर्जा उंचाविण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुसरीकडे काही शाळांमध्ये भाैतिक सुविधा उपलब्ध करण्याला अजून बराच वाव आहे. गतवर्षी जिल्हा परिषदेच्या पहिली ते दहावीतील एकूण पटसंख्या ६५ हजार ४२३ होती. यंदा यामध्ये ७६५ने घट होत जवळपास ६४ हजार ६५८ झाल्याची माहिती आहे. कोरोनामुळे उन्हाळ्यात मजूर, कामगार त्यांच्या मूळ गावी गेले. त्यापैकी काही परत आले नसल्याने पटसंख्या घटली.


परगावचे विद्यार्थी परत न आल्याचा परिणाम
यंदा कोरोनामुळे मजूर व कामगार हे आपापल्या मूळ गावी परतले. यापैकी अनेकजण परत वाशिम जिल्ह्यात आले नाहीत. त्यामुळे या पाल्यांचे प्रवेश त्यांच्या जिल्ह्यात झाले. तसेच काही पालकांनी खासगी शाळेला पसंती दिल्याने पटसंख्येत घट आल्याचे दिसून येते. मजूर, कामगार हे जिल्ह्यात परतल्यानंतर इयत्ता पहिली ते दहावीतील पटसंख्या पूर्ववत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये पुरेशा प्रमाणात भाैतिक सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. विविधांगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. यंदा कोरोनामुळे काहीजण हे त्यांच्या स्वजिल्ह्यात परतले. त्यामुळे पटसंख्या काही अंशी कमी झाली आहे.
- अंबादास मानकर, शिक्षणाधिकारी

Web Title: 1st to 10th grade dropout dropped by 765!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.