मालेगावात दोन लाख २0 हजाराची चोरी
By admin | Published: January 17, 2015 12:43 AM2015-01-17T00:43:58+5:302015-01-17T00:43:58+5:30
अज्ञात चोरटयांनी घरामध्ये प्रवेश करुन सोन्याचे दागिने, रोख रक्कम मिळून २ लाख २0 हजार रुपयाचा ऐवज लंपास केला.
मालेगाव (जि. वाशिम) : येथील संतोषी माता मंदिर शेलू फाट्यानजीक असलेल्या स्वप्निल गिरी यांच्या घराचे तिसर्या मजल्यावरील खिडकीचे काच तोडून अज्ञात चोरटयांनी घरामध्ये प्रवेश करुन सोन्याचे दागिने, रोख रक्कम मिळून २ लाख २0 हजार रुपयाचा ऐवज लंपास केला. ही घटना १४ जानेवारीचे रात्री घडली.
स्वप्निल छगन गिरी यांची आई उमाबाई व भाऊ सुरज हे १४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजताचे सुमारास माहूर येथे देवदर्शनासाठी गेले होते आणि स्वप्निल गिरी हे त्यांचे शेतामध्ये असलेल्या डेअरी प्लॅन्टवर गेले असल्याची संधी पाहून अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घराच्या पश्चिमेकडील खिडकीचे काच तोडून घरात प्रवेश केला. घरातील आलमारी उघडून त्यामधील सोन्याच्या तीन नग नथ अंदाजे वजन ४ ग्रॅम, गहू पोथेचे मणी १0 ग्रॅम आणि काळे मणी असलेली सोन्याची चेन वजन ४0 ग्रॅम असे एकूण १,३५,000 रुपयांचे दागिने व रोख ४८,000 रुपये मिळून एकूण २,२0,000 रुपयाचा ऐवज लंपास केला. ही बाब १५ जानेवारी रोजी गिरी कुटुंबिय घरी परत आल्यानंतर लक्षात आली. याबाबत रात्री ११ वाजता पोलीस स्टेशनला सदर घटनेची फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम ४५७, ४५४, ३८0 भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.
१६ जानेवारी रोजी सकाळी या चोरीच्या तपासासाठी वाशिम येथून श्वान पथक बोलाविण्यात आले हो ते. त्याने कुठलाही संकेत दिला नाही. यावेळी मॅक्सी श्वानपथकासोबत डॉग ट्रेनर शेजोळकर, पीएसआय गायकवाड, एलसीबीचे ए.पी. आय चव्हाण, पोहेकॉ तायडे, पोकॉ गोटे यांची उपस्थिती होती. मालेगावचे ठाणेदार आर.एस. तट यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय नांदगावकर, पोहेकॉ राजू गिरी, पोहेकॉ संतोष पाईकराव हे तपास करीत आहेत.