शेलूबाजार येथे आणखी २ कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:38 AM2021-04-26T04:38:15+5:302021-04-26T04:38:15+5:30

०००० गर्दीवर नियंत्रणासाठी भरारी पथकाची गरज वाशिम: गर्दीवर नियंत्रणाकरिता भरारी पथकाची आवश्यकता आहे. हे भरारी पथक पंचायत समिती गणनिहाय ...

2 more corona patients at Shelubazar | शेलूबाजार येथे आणखी २ कोरोना रुग्ण

शेलूबाजार येथे आणखी २ कोरोना रुग्ण

Next

००००

गर्दीवर नियंत्रणासाठी भरारी पथकाची गरज

वाशिम: गर्दीवर नियंत्रणाकरिता भरारी पथकाची आवश्यकता आहे. हे भरारी पथक पंचायत समिती गणनिहाय तयार करण्यात यावेत, या पथकामध्ये तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, बिट जमदार यांची नियुक्ती करण्याची गरज आहे.

००

कासोळा येथे आरोग्य तपासणी

वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील कासोळा येथे आणखी दोन कोरोना रुग्ण आढळून आले असून, संदिग्ध रुग्णांची तपासणी रविवारी करण्यात आली. नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

०००

प्लास्टिक पिशवी दिसल्यास कारवाई

वाशिम : प्लास्टिक पिशव्यांचा वापर करण्यास मनाई आहे. शहरातील विक्रेत्यांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये तसेच ग्राहकांनादेखील प्लास्टिक पिशव्यांमध्ये अन्य वस्तू देऊ नये, अशा सूचना नगर परिषद प्रशासनाने केल्या.

००००००००

जिल्ह्याबाहेरील २२ बाधितांची नोंद झाली

वाशिम : जिल्ह्याबाहेरील २२ कोेरोना बाधितांची नोंद रविवारी आरोग्य विभागाने घेतली आहे. कोरोना संसर्ग वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

००

कायमस्वरूपी बीडीओ केव्हा मिळणार?

वाशिम : वाशिम, रिसोड, मंगरूळपीर पंचायत समितीचे गत एका वर्षापासून कायमस्वरूपी गटविकास अधिकाऱ्यांचे (बीडीओ) पद रिक्त आहे. या पदाचा प्रभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. तीन पंचायत समितीला कायमस्वरूपी गटविकास अधिकारी केव्हा मिळणार, याकडे पदाधिकारी, पंचायत समिती सदस्यांचे लक्ष लागून आहे.

०००

खासगी फायनान्सची कर्जवसुली थांबवा

वाशिम : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे छोटे, मोठे व्यवसाय बंद असल्याने व्यावसायिक, शेतकरी व हातावर पोट असणारे मजूरदार हे आर्थिक अडचणीत सापडले आहे. त्यांनी बँक, खासगी फायनान्सकडून घेतलेले कर्ज वसुलीला मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे.

००

Web Title: 2 more corona patients at Shelubazar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.