ग्रामीण भागातून चोरीच्या २० मोटारसायकली जप्त!, एका आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 14:41 IST2018-02-14T14:41:03+5:302018-02-14T14:41:14+5:30
मिळालेल्या गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने आसिफ खान इब्राहिम खान (रा.अनसिंग) यास अटक केली. त्याची कसून चौकशी केली

ग्रामीण भागातून चोरीच्या २० मोटारसायकली जप्त!, एका आरोपीस अटक
वाशिम : मिळालेल्या गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने आसिफ खान इब्राहिम खान (रा.अनसिंग) यास अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता, कारंजा, मानोरा, मंगरूळपिरातून चोरलेल्या तब्बल २० मोटारसायकली ग्रामीण भागात विकल्याची कबूली त्याने दिल्यावरून पोलिसांनी अनसिंग, लाखी, उमरा कापसे, मोठा उमरा आदी ठिकाणांहून ही वाहने जप्त केली.
जिल्ह्यातील शहरी भागातून दुचाकी वाहने चोरीस जाण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून वाढले आहेत. ही बाब लक्षात घेवून स्थानिक गुन्हे शाखेने विशेष पथक गठीत करून चौकशीस प्रारंभ केला आहे. यादरम्यान, आसीफ खान इब्राहिम खान पोलिसांच्या तावडीत सापडला असून त्याने कारंजा, मानोरा, मंगरूळपीर परिसरातून बºयाच मोटारसायकली चोरल्याची कबूली दिली आहे. त्यानुसार, ज्याठिकाणी ही वाहने विकल्या गेली, त्याठिकाणी जावून पोलिसांनी ती ताब्यात घेतली आहेत. याशिवाय दोन महिण्यांपूर्वी मालेगाव पोलिस ठाण्यात नोंदविल्या गेलेल्या चोरीच्या प्रकरणातील बोलेरो हे चारचाकी वाहनही पोलिसांनी जाफ्राबाद (जि.जालना) येथून ३ आरोपींसह हस्तगत केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेने दिली.