जिल्हा रुग्णालयातच २० व्हेंटिलेटर पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:38 AM2021-04-03T04:38:36+5:302021-04-03T04:38:36+5:30
जिल्ह्यात २ एप्रिलपर्यंत १६६९९ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी १३८५२ व्यक्तींनी कोरोनावर मात केली, तर १८८ जणांचा मृत्यू झाला ...
जिल्ह्यात २ एप्रिलपर्यंत १६६९९ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी १३८५२ व्यक्तींनी कोरोनावर मात केली, तर १८८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत २६५८ व्यक्ती अॅक्टीव्ह आहेत. जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गामुळे आरोग्य विभागही त्रस्त झाला आहे. त्यात वृद्धांना कोरोना संसर्गाची लागण झाल्यानंतर त्यांना वेळेत रुग्णालयात दाखल केले जात नाही. त्यामुळे त्यांची स्थिती गंभीर होऊन मृत्यू ओढवण्याची शक्यता असते. एखादवेळी गरज पडल्यास त्यांना व्हेंटीलेटरवरही ठेवले जाते. यासाठी जिल्हास्तर कोविड केअर सेंटरमध्ये २७, तर वाशिम शहरातील खासगी कोविड सेंटरमध्ये ९ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. सद्यस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयात केवळ ७ व्यक्ती व्हेंटिलेटरवर आहेत.
----------------
एकूण व्हेंटीलेटर - ३६
जिल्ह्यात उपचार सुरू असलेले रुग्ण-
जिल्हा रुग्णालयात दाखल गंभीर रुग्ण -१२
जिल्हा रुग्णालयातील व्हेंटिलेटर -२७
-----------------
जिल्हा रुग्णालयात २० व्हेंटिलेटर शिल्लक
जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित गंभीर व्यक्तींच्या उपचारात क ोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून आरोग्य विभागाने २७ व्हेंटिलेटर उपलब्ध केले आहेत. त्यापैकी ७ व्हेंटिलेटरवर रुग्ण असून, इतर २० व्हेंटिलेटर पडून आहेत. खासगी कोविड के अर सेंटरमध्येही ९ व्हेंटिलेटर उपलब्ध असून, यातील एकही व्हेंटिलेटर सध्या वापरात नाही. प्रत्यक्षात गंभीर रुग्णांची संख्या कमी असल्याने व्हेंटिलेटरचा वापरच केला जात नसल्याचे दिसत आहे.
-----------------
आवश्यतेनुसार मिळते व्हेंटिलेटर
-जिल्ह्यात खासगी कोविड सेंटर आणि जिल्हा रुग्णालयात मिळून पुरेसे व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. त्यात गंभीर रुग्णांची संख्या कमी आहे. त्यामुळे व्हेंटिलेटरची आवश्यकता भासत नाही.
.-जिल्हा रुग्णालयात २० व्हेंटिलेटर शिल्लक असून, कोणत्याही सेंटरमध्ये एखादवेळी रुग्ण वाढल्यास त्यांना तातडीने व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे कोणतीही अडचण जाणवत नाही.
- जिल्हा रुग्णालयात दाखल प्रत्येक गंभीर रुग्णाला अनेकदा व्हेंटिलेटरची गरजही पडत नाही. त्यामुळे उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटरचा वापर करण्याची आवश्यकताही भासत नाही.
---------
कोट: कोणत्याही कोविड सेंटरला व्हेंटिलेटरचा तूटवडा जाणवत नाही. प्रत्येक सेंटरला पुरेसे व्हेंटिरलेटर उपलब्ध आहेत. गंभीर रुग्णांची संख्याही तुलनेत खूप कमी आहे. जिल्ह्यात ३६ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. त्यापैकी केवळ ७ व्हेंटिलेटरचा वापर होत आहे.
-डॉ. मधुकर राठोड,
जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम
----------------------