२00 लाभार्थींंच्या शौचालय अनुदानाचा तिढा सुटला !

By admin | Published: June 20, 2016 02:07 AM2016-06-20T02:07:40+5:302016-06-20T02:07:40+5:30

वाशिम जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने केला २४ लाखांचा निधी मंजूर.

200 beneficiaries' toilet sanctioned! | २00 लाभार्थींंच्या शौचालय अनुदानाचा तिढा सुटला !

२00 लाभार्थींंच्या शौचालय अनुदानाचा तिढा सुटला !

Next

वाशिम: नगर पंचायत स्थापनेपूर्वी शौचालय बांधकाम पूर्ण करणार्‍या मानोर्‍यातील २00 लाभार्थींंना आता जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने २४ लाखांचा निधी मंजूर केला आहे. लवकरच या निधीचे वितरण संबंधित लाभार्थींंना होणार आहे. स्वच्छ भारत मिशनमधून शौचालय बांधकाम करण्याला प्रथम प्राधान्य दिले जाते. शौचालय बांधकाम पूर्ण करणार्‍या लाभार्थीला १२ हजार रुपये अनुदान दिले जाते. मानोरा ग्रामपंचायत असताना, शहरातील २00 लाभार्थींंनी शौचालय बांधकाम पूर्ण केले. त्यानंतर मानोरा नगर पंचायत अस्तित्वात आली. दरम्यान, शौचालय अनुदानाची रक्कम कुणी द्यावी, असा प्रश्न निर्माण झाला. नगर पंचायत अस्तित्वात येण्यापूर्वी शौचालय बांधकाम पूर्ण झाल्याने अनुदानाची रक्कम जिल्हा परिषद प्रशासनाने द्यावी, अशी भूमिका नगर पंचायत प्रशासनाने घेतली. यासंदर्भात ह्यलोकमतह्णने २८ मार्च २0१६ रोजी वृत्त प्रकाशित केले होते. जिल्हा परिषद सदस्य हेमेंद्र ठाकरे यांनी याबाबत जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला. मानोरा ग्रामपंचायत असताना शौचालय बांधकाम पूर्ण झाल्याने २00 लाभार्थींंचे प्रत्येकी १२ हजार अनुदान याप्रमाणे २४ लाख रुपये जिल्हा परिषदेने द्यावे, अशी भूमिका हेमेंद्र ठाकरे यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील व जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्याशी चर्चा केली. २00 लाभार्थींंना २४ लाखांचे अनुदान देण्याची मागणी लावून धरल्याने जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाने मानोर्‍यातील २00 लाभार्थींंंना अनुदान देण्याची मागणी मान्य करून, तसे पत्र हेमेंद्र ठाकरे यांना सुपूर्द केले होते; मात्र मे २0१६ पर्यंंतही निधी वितरित केला नव्हता. यासंदर्भात पुन्हा ठाकरे यांनी सीईओ पाटील यांच्याशी चर्चा करून निधी वितरित करण्याची मागणी केली. जूनच्या दुसर्‍या आठवड्यात जिल्हा परिषदेने मानोरा पंचायत समितीकडे निधी पाठविला आहे. ३१ मार्च पूर्वी वैयक्तिक शौचालय बांधकाम पूर्ण करणार्‍या लाभार्थींंंना सदर अनुदान वितरित करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी मानोरा गटविकास अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

Web Title: 200 beneficiaries' toilet sanctioned!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.