‘खाकी’तील २०० कर्मचारी पॉझिटिव्ह, ६७ अ‍ॅक्टिव्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:39 AM2021-03-24T04:39:24+5:302021-03-24T04:39:24+5:30

वाशिम : जनतेच्या रक्षणासाठी सदैव सज्ज राहणाऱ्या पोलीस दलालाही कोरोनाचा घट्ट विळखा बसला आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील तब्बल ...

200 employees of 'Khaki' positive, 67 inactive! | ‘खाकी’तील २०० कर्मचारी पॉझिटिव्ह, ६७ अ‍ॅक्टिव्ह!

‘खाकी’तील २०० कर्मचारी पॉझिटिव्ह, ६७ अ‍ॅक्टिव्ह!

Next

वाशिम : जनतेच्या रक्षणासाठी सदैव सज्ज राहणाऱ्या पोलीस दलालाही कोरोनाचा घट्ट विळखा बसला आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील तब्बल २०० पोलीस कर्मचारी कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आले. त्यातील ११४ जण कोरोनामुक्त झाले असून ६७ जण सध्या ‘अ‍ॅक्टिव्ह’ आहेत. या काळात एका अंमलदाराचा कोरोनाने मृत्यू झाला. तथापि, सर्वसामान्य नागरिकांसोबतच जनतेचे रक्षणकर्तेही कोरोनापुढे हतबल झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे संकट दिवसागणिक गंभीर होत चालले आहे. फेब्रुवारीअखेर कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा ८ हजार ९३४ होता. चालू महिन्यात २२ मार्चपर्यंत त्यात तब्बल ४ हजार २६६ने वाढ होऊन सध्या हा आकडा १३ हजार २०० झाला आहे. दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांसोबतच प्रशासकीय कार्यालयांमध्ये कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लक्षणे दिसत नसली तरी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. त्यानुषंगाने आरटीपीसीआर, अ‍ॅन्टिजेन चाचण्यांचे प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये वाढविण्यात आले आहे. त्यानुसार, पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही कोरोना चाचणी करण्याची प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत २०० पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील ११४ जण आतापर्यंत उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले; तर ६७ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. एका अंमलदाराचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली.

....................

९२

जिल्ह्यात कार्यरत पोलीस अधिकारी

१३९८

कार्यरत अंमलदार

२००

कोरोना ‘पॉझिटिव्ह’

६७

सध्या ‘अ‍ॅक्टिव्ह’

०१

कोरोनाने मृत्यू

...........................

कोट :

ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता सदैव जनतेच्या रक्षणाची जबाबदारी समर्थपणे पेलणारे पोलीस दलातील कर्मचारीही कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत. गेल्या काही दिवसांत २०० कर्मचाऱ्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून ६७ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावत असताना तोंडाला मास्क लावून ठेवावे. इतरही खबरदारीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी.

- वसंत परदेशी, जिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम

Web Title: 200 employees of 'Khaki' positive, 67 inactive!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.