२०० विद्यार्थी देणार निवड चाचणी प्रवेश परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 04:48 PM2019-01-30T16:48:57+5:302019-01-30T16:49:15+5:30

वाशिम : स्थानिक जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता नववी प्रवेशाकरीता रिक्त असलेल्या दोन जागांकरिता २०० विद्यार्थी २ फेब्रुवारी रोजी निवड चाचणी प्रवेश परीक्षा देणार आहेत.

200 students will be given the test entrance test | २०० विद्यार्थी देणार निवड चाचणी प्रवेश परीक्षा

२०० विद्यार्थी देणार निवड चाचणी प्रवेश परीक्षा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : स्थानिक जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता नववी प्रवेशाकरीता रिक्त असलेल्या दोन जागांकरिता २०० विद्यार्थी २ फेब्रुवारी रोजी निवड चाचणी प्रवेश परीक्षा देणार आहेत.
केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्यावतीने वाशिम येथे मुला-मुलींकरिता निवासी स्वरूपाचे जवाहर नवोदय विद्यालय आहे. सन २०१९-२० या वर्षासाठी  विद्यालयाच्या इयत्ता ९ वी प्रवेशाकरिता रिक्त असलेल्या दोन जागांकरिता २०० विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेचे अर्ज आॅनलाईन पद्धतीने भरले आहेत. या विद्यार्थ्यांची निवड चाचणी प्रवेश परीक्षा २ फेब्रुवारी २०१९ रोजी वाशिम येथील एका परीक्षा केंद्रावर घेतली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचे आॅनलाईन अर्ज भरले आहेत, त्यांनी परीक्षेचे प्रवेशपत्र शासनाच्या संकेतस्थळावरून प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. परीक्षेला उशिरा येणाºया विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार नाही. परीक्षर्थिनी सोबत प्रवेशपत्र व बॉलपेन सोबत आणावा. अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर. एस. चंदनशिव यांनी केले.

Web Title: 200 students will be given the test entrance test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.