गोवर्धना येथे पुन्हा एकाच दिवशी २०७ कोरोना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:40 AM2021-04-17T04:40:08+5:302021-04-17T04:40:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिरपूर जैन : शिरपूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या गोवर्धना येथे दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ...

207 corona positive again on the same day at Govardhana | गोवर्धना येथे पुन्हा एकाच दिवशी २०७ कोरोना पाॅझिटिव्ह

गोवर्धना येथे पुन्हा एकाच दिवशी २०७ कोरोना पाॅझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरपूर जैन : शिरपूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या गोवर्धना येथे दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मंगळवारी २१० रुग्ण आढळल्यानंतर आता १६ एप्रिल रोजी पुन्हा एकाच दिवशी २०७ कोरोना रुग्ण आढळले आहेत. गोवर्धना येथील कोरोना रुग्णांची संख्या यामुळे ५००च्या वर पोहोचली आहे.

सतत वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येने परिसरामध्ये चिंता पसरली आहे. शिरपूरपासून १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या गोवर्धन येथे मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. चार दिवसांपूर्वी दोघांचा कोरोना आजाराने मृत्यूसुद्धा झाला आहे. सुरुवातीला कमी प्रमाणात निष्पन्न होत असलेल्या कोरोना रुग्णांमध्ये मात्र १४ एप्रिल रोजी एकदम २१०ची भर पडली तर १६ एप्रिल रोजी पुन्हा २०७ जण बाधित सापडले आहेत. त्यामुळे गोवर्धना येथील कोरोना रुग्णांची संख्या ५००हून अधिक झाली आहे. त्यामुळे गोवर्धनासह परिसरातील गावांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गोवर्धनासारख्या अतिलहान गावामध्ये एकाच दिवशी २१० व २०७ असे मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळणे हे आरोग्य विभागासह प्रशासनासमोरील मोठे आव्हान आहे. आरोग्य विभागाकडून याठिकाणी नियमित कोरोना चाचणी केल्या जात आहेत. तीन ते साडेतीन हजार लोकसंख्या असलेल्या गोवर्धना येथे आरोग्य विभागाकडून आतापर्यंत दीड हजार नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. लसीकरणाचे कामही सुरू आहे. तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, पोलीस हे गोवर्धना येथे कार्यरत असल्याचे तहसीलदार अजित शेलार यांनी सांगितले. गोवर्धना येथील उर्वरित ग्रामस्थांनी मनात भीती न बाळगता कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार शेलार यांनी केले आहे.

बॉक्स....

१५०० नागरिकांची चाचणी

सध्या गोवर्धना येथील १,५००हून अधिक नागरिकांची आतापर्यंत कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ५३४ जण बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. काही रुग्णांवर वाशिम व सवड येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत तर काही कोरोना बाधितांचे गावातील शाळेमध्ये विलगीकरण करण्यात आले आहे. संपूर्ण गावाला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. गावातून बाहेर जाण्यास व गावात येण्यास पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे.

Web Title: 207 corona positive again on the same day at Govardhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.