वाशिम जिल्ह्यातील २१ हजारांवर घरे झाली धूरमुक्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 03:13 PM2019-01-29T15:13:08+5:302019-01-29T15:13:40+5:30
वाशिम : रॉकेलवर चालणारे ‘स्टोव्ह’, मातीच्या चुली यापासून उठणाºया धुरापासून महिलांची कायम सुटका करण्यासाठी शासनस्तरावरून प्रधानमंत्री उज्वला योजना राबविण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : रॉकेलवर चालणारे ‘स्टोव्ह’, मातीच्या चुली यापासून उठणाºया धुरापासून महिलांची कायम सुटका करण्यासाठी शासनस्तरावरून प्रधानमंत्री उज्वला योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील ३९१ गावांमधील २१ हजार ५५४ कुटूंबांना स्वच्छ इंधन म्हणून गॅस जोडणी देण्यात आली आहे. यामुळे संबंधित कुटूंबांची घरे धूरमुक्त झाली आहेत.
ज्यांच्याकडे गॅस जोडणी नाही, अशा कुटुंबाचे स्वयंपाक घर धूरमुक्त व्हावे, आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटूंबातील महिलांना स्वयंपाक करताना त्रास होवू नये, या उद्देशाने केंद्र शासनाने सन २०१६ पासून प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना अंमलात आणली. या योजनेत अनुसूचित जाती-जमाती कुटुंब, अंत्योदय, अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी, जंगल प्रभावित कुटुंब, अति मागासप्रवर्ग, नदीकाठालगत वास्तव्य करणारे कुटुंब आदिंचा समावेश करण्यात आला. याअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील २१ हजार ५५४ कुटूंबांना गॅस जोडणी देण्यात आली असून संबंधित कुटूंबांची यामुळे सोय झाली आहे.