सात दिवसात वाशिम तालुक्यात आढळले २१४ कोरोना रुग्ण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:44 AM2021-03-09T04:44:30+5:302021-03-09T04:44:30+5:30

वाशिम : मार्च महिन्यात सुरुवातीच्या सात दिवसात वाशिम शहरात १३६ आणि ग्रामीण भागात ७८ असे एकूण २१४ कोरोना रुग्ण ...

214 corona patients found in Washim taluka in seven days! | सात दिवसात वाशिम तालुक्यात आढळले २१४ कोरोना रुग्ण !

सात दिवसात वाशिम तालुक्यात आढळले २१४ कोरोना रुग्ण !

Next

वाशिम : मार्च महिन्यात सुरुवातीच्या सात दिवसात वाशिम शहरात १३६ आणि ग्रामीण भागात ७८ असे एकूण २१४ कोरोना रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग अलर्ट झाला. शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांची चिंताही वाढली आहे.

देशात मार्च २०२०पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. वाशिम शहरात जून महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. ऑगस्ट ते सप्टेंबर २०२० या दरम्यान वाशिम शहरासह तालुक्यातही कोरोना बाधितांची संख्या वाढली होती. कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यूही पाळला. याला वाशिमकरांचा चांगलाच प्रतिसाद लाभला. ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख खालावला. जानेवारी महिन्यापर्यंत हा आलेख खालावलेला होता. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला कोरोना बाधितांच्या संख्येत चढ - उतार येत १४ फेब्रुवारीपासून अचानक कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. मार्च महिन्यात यामध्ये आणखी वाढ झाली. वाशिम शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे ठरत आहे. ग्रामीण भागातही कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. गत सात दिवसात वाशिम शहरात १३६ आणि ग्रामीण भागात ७८ असे एकूण २१४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संदिग्ध रुग्णांची तपासणी आणि कोरोना चाचणी केली जात आहे. नागरिकांनीदेखील सतर्क राहावे, असे आवाहन तालुका प्रशासन व आरोग्य विभागाने केले.

०००

असे आढळले रुग्ण

तारीखशहरग्रामीण

१ मार्च २१ १०

२ मार्च १६ ०३

३ मार्च १६ १०

४ मार्च १५ १०

५ मार्च १५ १६

६ मार्च २१ १९

७ मार्च ३२ १०

एकूण १३६ ७८

०००

बॉक्स

लक्षणे दिसताच कोरोना चाचणी करावी !

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे आदी लक्षणे दिसताच तातडीने कोरोना चाचणी करावी. वेळीच निदान झाले तर उपचार करणे सोयीचे होते. वेळीच उपचार मिळाल्याने संबंधित रुग्ण हे कोरोनातून लवकर बरे होत असल्याने नागरिकांनी कोणताही आजार लपवू नये, लक्षणे दिसताच चाचणी करावी, असे आवाहन तालुका प्रशासन व आरोग्य विभागाने केले.

००००

कोट बॉक्स

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. नागरिकांनीदेखील घराबाहेर पडताना नेहमी मास्कचा वापर करावा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे आणि हात वारंवार धुवावे. लक्षणे दिसून येताच कोरोना चाचणी करावी.

- विजय साळवे

तहसिलदार, वाशिम

Web Title: 214 corona patients found in Washim taluka in seven days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.