वाशिम शहरात कोरोना काळात संकलित झाला २१६ मेट्रिक टन जैविक कचरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 11:41 AM2021-01-10T11:41:14+5:302021-01-10T11:41:25+5:30
BioWaste in Washim प्रतिमाह ४ ते ५ मेट्रिक टनने वाढ झाल्याचे नगर परिषदमध्ये कचरा संकलनाच्या नाेंदीवरून दिसून येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: काेराेना संसर्ग काळात वाशिम शहरात २१६ मेट्रिक टन जैविक कचरा जमा करण्यात आला असून, यामध्ये प्रतिमाह ४ ते ५ मेट्रिक टनने वाढ झाल्याचे नगर परिषदमध्ये कचरा संकलनाच्या नाेंदीवरून दिसून येते.
वाशिम शहरात २५ घंटागाड्यांसह ८ ट्रॅक्टरद्वारे जैविक कचऱ्याचे संकलन केल्या जाते. काेराेनापूर्वी वाशिम शहरात १८ ते २० मेट्रिक टन कचरा संकलित व्हायचा. मार्च महिन्यानंतर या कचऱ्यात २२ टक्क्यांनी वाढ हाेऊन प्रतिदिन ५ मेट्रिक टन कचरा वाढल्याचे दिसून येत आहे. काेराेनाकाळातील ९ महिन्यांमध्ये प्रतिदिन २४ ते २५ मेट्रिक टन कचऱ्यानुसार ९ महिन्यांमध्ये २१६ मेट्रिक टन खत संकलित करण्यात आले. जे काेराेनापूर्वी ९ महिन्यांचा विचार करता १८० मेट्रिक टन हाेते. यामध्ये ३६ मेट्रिक टनाने वाढ झाल्याचे दिसून येते. वाशिम शहरामध्ये नगर परिषदेच्यावतीने रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर काेणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. यासंदभार्त संबंधितांशी चर्चा केली असता कचरा टाकणारा व्यक्ती दिसून येत नसल्याने कारवाई करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. जानेवारी महिन्यापासून याबाबत माेहीम सुरू करण्यात आली असून दंडात्मक व फाैजदारी कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले
काेराेनाकाळात दरमहा वाढला ४ टन कचरा
काेरानापूर्वी दरमहा २० टन कचरा नगर परिषदेतर्फे जमा केला जायचा. मार्चपासून लाॅकडाऊन व काेराेनाकाळामध्ये दरमहा २४ टन कचरा जमा झाला. यामध्ये प्रत्येक महिन्याला ३ ते ४ टन कचऱ्यात वाढ झाल्याची माहिती नगर परिषदेच्या आराेग्य विभागाच्यावतीने देण्यात आली.
काेराेनाचा संसर्ग पाहता नगरपरिषदेतर्फे घंटागाडीद्वारे जैविक कचरा संकलन केला जातो. काही नागरिक कचरा रस्त्यावर टाकतात. त्यांच्यावर न.प.तर्फे जानेवारी महिन्यापासून दंडात्मक व फाैजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
- जितु बढेल,
आराेग्य निरिक्षक, न.प. वाशिम