दुसर्या दिवशी २२ लाखांची मालमत्ता जप्त!
By admin | Published: March 16, 2017 02:57 AM2017-03-16T02:57:50+5:302017-03-16T02:57:50+5:30
वाशिम नगर परिषद; दोन दिवसांत ७६ लाख रुपये मालमत्ता जप्त.
वाशिम, दि. १५- ज्या नागरिकांकडे थकीत कर होता, अशा थकीतदारांची मालमत्ता जप्ती करण्याची मोहीम वाशिम नगरपरिषदेच्यावतिने राबविण्यात येत आहे. १५ मार्च रोजी दुसर्या दिवशीसुद्धा २२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. प्रथम दिवशी १४ मार्च रोजी १0 जणांची ५४ लाख रुपयांची मालमत्ता व १५ मार्च रोजी २२ लाख रुपयांची अशी एकूण ७६ लाख रुपयांची मालमत्ता थकीत करधारकांची वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या आदेशानुसार जप्त करण्यात आली. १५ मार्च रोजी थकीत करधारकांची मालमत्ता जप्त करण्यात आली. यामध्ये बालाजी संस्थान/दीपक लक्ष्मण गाडे ३४४८९५ रुपये, अध्यक्ष अग्रसेन भवन ट्रस्ट २४४८२५ रुपये, टिळक स्मारक भवन/ रमेश टॉकीज भवरीलाल लढ्ढा २२९४९८, धारक विद्यासागर गुरुकुल २0९६५३, नारायण सुरजमल वर्मा २0८४२0, बुगदा बी शे. नबाब/शे. मजिद शे. उस्मान १८८१७0, ईश्वरी रेसिटेंड गृह निर्माण संस्था वाशिम/ रमेश गेलाराम नेनवाणी १२६९७५, रमेशचंद्र लक्ष्मीनारायण इन्नाणी १२५७५७, जाईबाई सखाराम शिंदे १२0३१३, दिगांबर बाबूराव शेळके ११४२७९, जयकुमार वर्धमान जोगी १0३९९२, भागवत गोविंदराव राऊत १00५३५, भगवान भिवसन शिंदे ९९७४९ रुपयांच्या मालमत्तेचा समावेश आहे. सदर मालमत्ता जप्तीची कार्यवाही मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या आदेशानुसार कर निरिक्षक अ.अजीज अ. सत्तार, सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करसंग्राहक साहेबराव उगले, संतोष किरळकर, शिवाजी इंगळे, दत्तात्रय देशपांडे, केशव खोटे, नाजीमोद्दीन मुल्लाजी, रमजान बेनीवाले, संजय काष्टे, मनोज इंगळे, कुणाल कनोजे, मुन्ना खान यांनी केली.