पाचवी ते दहावीच्या २२ शाळा अद्याप बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:43 AM2021-02-09T04:43:13+5:302021-02-09T04:43:13+5:30
पाचवीपासून दहावीपर्यंतच्या जिल्ह्यात एकूण ९२९ शाळा आहेत. सर्व शाळा सुरू करीत असताना शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ७१ ...
पाचवीपासून दहावीपर्यंतच्या जिल्ह्यात एकूण ९२९ शाळा आहेत. सर्व शाळा सुरू करीत असताना शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ७१ शिक्षकांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये अद्यापपर्यंत सुरू न झालेल्या २२ शाळांमधील शिक्षकांचाही समावेश असून काही शाळा निवासी असल्याने सुरू होऊ शकल्या नाहीत. सुरू झालेल्या ९०७ शाळांमध्ये सद्य:स्थितीत १ लाख २२ हजार ५० विद्यार्थ्यांपैकी ७४ हजार ७१० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
.................
जिल्ह्यातील शाळांची सद्य:स्थिती
९२९
पाचवी ते दहावीपर्यंतच्या शाळा
९०७
सुरू झालेल्या शाळा
१२२०५०
विद्यार्थी संख्या
७४७१०
उपस्थित विद्यार्थी
.........................
कोणत्या तालुक्यात किती शाळा बंद?
मालेगाव - ०२
मंगरुळपीर - ०६
मानोरा - ०३
रिसोड - ०५
वाशिम - ०६
कारंजा - ००
.......................
शाळा बंद असल्याची कारणे
जिल्ह्यातील पाचवी ते दहावीच्या ९२९ शाळांपैकी ९०७ शाळा सुरू झाल्या; तर २२ शाळा बंद आहेत. त्यामागील प्रमुख कारण म्हणजे संबंधित शाळांमधील काही शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. याशिवाय काही शाळा निवासी असल्याने सुरू झालेल्या नाहीत.
.................
जिल्ह्यात ७१ शिक्षक, कर्मचारी आढळले पॉझिटिव्ह
पाचवी ते दहावीपर्यंतच्या शाळांवर शिकविणाऱ्या सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यातील ७१ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. संबंधितांवर आरोग्य विभागाकडून उपचार सुरू आहेत. ते बरे झाल्यानंतर सदर शाळा सुरू होणार आहेत.
.............
कोट :
शासनाच्या आदेशानुसार, जिल्ह्यातील पाचवी ते दहावीपर्यंतच्या ९०७ शाळा सुरू करण्यात आल्या. ७४ हजार ७१० विद्यार्थ्यांना या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे; मात्र शिक्षक पॉझिटिव्ह आढळणे व काही शाळा निवासी असल्याने सदर २२ शाळा अद्याप सुरू होऊ शकल्या नाहीत.
- अंबादास मानकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, वाशिम