अडाण नदीपात्रात आमगव्हाण येथील २२ वर्षीय युवक गेला वाहून!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 18:41 IST2020-09-14T18:41:31+5:302020-09-14T18:41:37+5:30
शेतातून घरी परत येत असताना पाण्याचा प्रवाह वाढल्याने सोपान हा नदीपात्रात वाहून गेला.

अडाण नदीपात्रात आमगव्हाण येथील २२ वर्षीय युवक गेला वाहून!
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर : शेतातून परत येत असताना पाण्याचा प्रवाह वाढल्याने २२ वर्षीय सोपान दहातोंडे युवक हा अडाण नदीच्या पात्रात वाहून गेल्याची घटना १४ सप्टेंबरच्या सकाळी तालुक्यातील आमगव्हान येथे उघडकीस आली.
आमगव्हान येथील प्रभाकर दहातोंडे (५७) यांचा पुतण्या सोपान श्रीकृष्ण दहातोंडे हा १४ सप्टेंबरच्या सकाळी पाण्याचा प्रवाह कमी असल्याने अडाण नदीचे पात्र ओलांडून एका जणासोबत शेताकडे चक्कर मारायला गेला होता. शेतातून घरी परत येत असताना पाण्याचा प्रवाह वाढल्याने सोपान हा नदीपात्रात वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच गावकºयांनी घटनास्थळ गाठले. मात्र, त्याचा शोध लागला नाही. पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालिन पथकातील एक जण सोपानचा शोध घेत आहे. वृत्त लिहिस्तोवर युवकाचा शोध लागला नव्हता.