वाशिमात सहा केंद्रांवर २२९६ विद्यार्थ्यांनी दिली नीट परीक्षा
By संतोष वानखडे | Published: May 7, 2023 05:43 PM2023-05-07T17:43:04+5:302023-05-07T17:43:42+5:30
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा महत्वपूर्ण मानली जाते.
वाशिम : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्वपूर्ण समजली जाणारी नीट परीक्षा रविवार, ७ मे रोजी वाशिम शहरातील सहा केंद्रांत पार पडली. २३२८ उमेदवारांची नोंदणी असताना, २२९६ जणांनी परीक्षा दिली तर ३२ विद्यार्थी गैरहजर राहिले. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा महत्वपूर्ण मानली जाते.
एकूण २३२८ उमेदवारांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. रविवारी वाशिम शहरातील आर.ए. कॉलेज, हॅप्पी फेसेस द कन्सेप्ट स्कूल, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, शिवाजी हायस्कूल आणि ज्यू. कॉलेज या सहा केंद्रावर दुपारी २ ते ५ या वेळेत परीक्षा घेण्यात आली. २२९६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, ३२ विद्यार्थी गैरहजर राहिले. वाशिम शहराचे परीक्षा समन्वयक म्हणून प्राचार्य अरूण सरनाईक यांनी कामकाज पाहिले.