२३ जणांची कोरोनावर मात; २० पॉझिटिव्ह !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:27 AM2021-06-28T04:27:39+5:302021-06-28T04:27:39+5:30
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले ...
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले असून, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे चित्र आहे. रविवारी नव्याने २० रुग्ण आढळून आले तर २३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मानोरा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. वाशिम तालुक्यात १, रिसोड तालुक्यात ६, मालेगाव तालुक्यात ८, मंगरूळपीर तालुक्यात २, कारंजा तालुक्यात ३ असे रुग्ण आढळून आले. आतापर्यंत ४१,३८० रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४०४९४ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंत ६१७ जणांचे मृत्यू झाले.
००००
२६८ सक्रिय रुग्ण
रविवारच्या अहवालानुसार नव्याने २० रुग्ण आढळून आले तर २३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण २३८ रुग्ण सक्रिय आहेत.
000000000000
मानोरा तालुका निरंक
रविवारच्या अहवालानुसार मानोरा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. वाशिम शहरात १, रिसोडच्या ग्रामीण भागात ६, मालेगावच्या ग्रामीण भागात ८, मंगरूळपीर शहरात १ तर ग्रामीण भागात १ आणि कारंजा शहरात १ तर ग्रामीण भागात २ रुग्ण आढळून आले.
00000000000000000000०००००००००००००००००