रोजी गेली, तरी २.३० लाख कुटुंबांना मिळणार रोटी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:39 AM2021-04-15T04:39:58+5:302021-04-15T04:39:58+5:30
देशात मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. गतवर्षी लॉकडाऊनदरम्यान अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब गटातील ...
देशात मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. गतवर्षी लॉकडाऊनदरम्यान अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थींना मोफत धान्याचा लाभ देण्यात आला होता. यंदादेखील कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्य शासनाने १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजतापासून निर्बंध कठोर केले आहेत. या दरम्यान गोरगरीब लाभार्थींना दिलासा म्हणून रेशनचे धान्य एका महिन्यासाठी मोफत देण्याचा निर्णय घेतला. याचा लाभ जिल्ह्यातील दोन लाख ३० हजार ७९ कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे.
००००
कोट बॉक्स
कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने निर्बंध कठोर केले आहेत. या दरम्यान गोरगरीब लाभाथींची गैरसोय होऊ नये म्हणून एका महिन्यासाठी मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दिलासा मिळेल.
- अरविंद वानखडे
००
मोफत धान्य मिळणार असल्याने गोरगरीब लाभार्थींमध्ये थोडेफार समाधान आहे. परंतु, रोजगार मिळणार नसल्याने चिंताही आहे. गव्हाचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे.
- शिवराम कांबळे
००००
शासनाने एक महिला पुरेल एवढा मोफत धान्यपुरवठा करावा. तांदळाचे प्रमाण कमी करून गव्हाचे प्रमाण वाढवायला हवे. धान्याचा दर्जाही चांगला हवा.
- रमेश पाईकराव
०००
बॉक्स
गहू व तांदूळ मिळणार
शासनाने मोफत धान्य देण्याची घोषणा केल्यानंतर यासंदर्भात पुरवठा विभागाकडून जिल्हास्तरीय यंत्रणेला अद्याप स्पष्ट सूचना अथवा निर्देश प्राप्त झाले नाहीत.
गतवर्षीप्रमाणेच एक किलो गहू व दोन किलो तांदूळ मिळू शकतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
०००
जिल्ह्यातील एकूण लाभार्थी संख्या
२३००७९