रोपवाटिकेसाठी शेतकऱ्यांना मिळणार २.३० लाख अनुदान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 01:09 PM2020-09-30T13:09:16+5:302020-09-30T13:09:25+5:30

पात्र शेतकºयांना प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के किंवा २.३० लाख रुपये अनुदान मिळणार आहे.

2.30 lakh subsidy to farmers for nursery! | रोपवाटिकेसाठी शेतकऱ्यांना मिळणार २.३० लाख अनुदान !

रोपवाटिकेसाठी शेतकऱ्यांना मिळणार २.३० लाख अनुदान !

googlenewsNext

वाशिम : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत राज्यात आॅक्टोबर महिन्यापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना राबविण्यात येणार असून, याअंतर्गत पात्र शेतकºयांना प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के किंवा २.३० लाख रुपये अनुदान मिळणार आहे. यासाठी जिल्ह्यातील शेतकºयांनी १९ आॅक्टोबरपर्यंत ‘महाडीबीटी’ संकेतस्थळावर किंवा तालुका कृषी अधिकाºयांकडे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी ३० सप्टेंबर रोजी केले.
भाजीपाला पिकांची दर्जेदार व कीडमुक्त रोपे निर्मिती उत्पादनात वाढ करणे, शेतकºयांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, शेतकºयांचे जीवनमान उंचाविण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना राबविली जाणार आहे. या योजनेमध्ये प्रामुख्याने कृषि पदवी किंवा पदविकाधारक, महिला बचत गटास प्राधान्य देण्यात येणार आहे. योजनेचा कालावधी २ वर्षाचा आहे. योजनेची अंमलबजावणी तालुकास्तरावरून करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी ७ व अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता ३ असे करून १० रोपवाटिका निर्मितीचा लक्ष्यांक असून याअंतर्गत प्रत्येक तालुक्यात किमान १ रोपवाटिका निर्मिती होईल, यादृष्टीने नियोजित आहे. यानुसार सर्वसाधारण प्रवर्गासाठी वाशिम तालुक्यात २ तर उर्वरित पाच तालुक्यांमध्ये प्रत्येकी १ रोपवाटिका निर्मिती तसेच अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता मंगरूळपीर, कारंजा व मानोरा तालुक्यात प्रत्येकी १ रोपवाटिका निर्मितीचा लक्ष्यांक नियोजित आहे. इच्छूक शेतकºयांनी २ आॅक्टोबर ते १९ आॅक्टोबर २०२० दरम्यान प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन तोटावार यांनी केले.

Web Title: 2.30 lakh subsidy to farmers for nursery!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.