२४ लाभार्थ्यांना मिळाली ४८ लाखांची नुकसानभरपाई!

By admin | Published: May 6, 2017 07:30 PM2017-05-06T19:30:54+5:302017-05-06T19:30:54+5:30

जिल्ह्यात गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत २४ लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करून ४८ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आल्

24 beneficiaries receive compensation of 48 lakhs! | २४ लाभार्थ्यांना मिळाली ४८ लाखांची नुकसानभरपाई!

२४ लाभार्थ्यांना मिळाली ४८ लाखांची नुकसानभरपाई!

Next

वाशिम : जिल्ह्यात गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत २४ लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करून ४८ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाली.
या योजनेंतर्गत विमाधारक शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे किंवा एक डोळा व एक अवयव निकामी होणे, अशा तिन्ही प्रकारांमध्ये दोन लाख रुपये; तर अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाते. संबंधित खातेदार शेतकऱ्यांचा विमा हप्ता देखील राज्यशासनाकडून भरला जातो. त्यानुसार, जिल्ह्यातील २४ लाभार्थ्यांना आतापर्यंत ४८ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आल्याचे कृषी विभागाने सांगितले.

Web Title: 24 beneficiaries receive compensation of 48 lakhs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.