शिरपूर येथे गवळी समाज सामूहिक विवाह सोहळ्यात २४ जोडपी होणार विवाहबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 02:11 PM2018-04-21T14:11:16+5:302018-04-21T14:11:16+5:30
शिरपूर जैन: गेल्या ४ वर्षांपासून गवळी समाजाच्यावतीने येथे सुरू करण्यात आलेली सामुहिक विवाह सोहळ्याची परंपरा अद्यापही अबाधित असून, या सोहळ्यात यंदा २२ एप्रिल रोजी २४ जोडपी विवाहबद्ध होणार आहेत.
शिरपूर जैन: गेल्या ४ वर्षांपासून गवळी समाजाच्यावतीने येथे सुरू करण्यात आलेली सामुहिक विवाह सोहळ्याची परंपरा अद्यापही अबाधित असून, या सोहळ्यात यंदा २२ एप्रिल रोजी २४ जोडपी विवाहबद्ध होणार आहेत.
मागील काही वर्षांपासून लग्न सोहळ्यात झगमगाट, बँण्डबॉजा, खानावळी, आहेर आदिंवर खर्च करण्याची प्रथाच रुढ झाली आहे. आवश्यक नसलेल्या कार्यक्रमांवर एकाच लग्नात लाखो रुपयांची उधळपट्टी केली जाते. शिरपूर जैन येथील गवळी समाजाने मात्र या प्रथेला फाटा देऊन सामुहिक विवाह सोहळ्याची आदर्श पद्धती अवलंबली आहे. गेल्या ४ वर्षांपासून या ठिकाणी गवळी समाजाच्यावतीने सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात येते. यंदा या सोहळ्यात २२ एप्रिल रोजीच २४ जोडपी विवाहबद्ध होणार आहेत. शिरपूर येथील शादिखाना परिसरात हा विवाह सोहळा होणार असून, या सोहळ्यात सहभागी जोडप्यांना दरवर्षीप्रमाणे संसारोपयोगी साहित्य वाटप केले जाणार आहे. राज्यभरातील विविध ठिकाणच्या जोडप्यांची यासाठी नोंदणीही झाली असून, या सोहळ्यात वºहाडी म्हणून येणाºया पाहुण्यांसह आमंत्रित हजारो लोकांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. गवळी समाजात कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या समाजात लग्नावर अधिक खर्च करणे परवडणारे नाही. ही समस्या लक्षात घेऊन समाजबांधवांचा खर्च वाचविण्यासह एक आदर्श निर्माण करण्याच्या उद्देशाने काही सुज्ञ बांधवांनी समाजापुढे सामूहिक विवाह सोहळ्याची संकल्पना मांडली. या संकल्पनेला गवळी समाजाकडून प्रतिसाद मिळाला आणि एक आदर्श प्रथा या समाजात पडली आहे. गेल्या तीन वर्षांत या सामूहिक विवाह सोहळ्यांत ९६ जोडपी विवाहबद्ध झाली असून, यंदा त्यात २४ जोडप्यांची भर पडणार आहे. विशेष म्हणजे या सर्व जोडप्यांच्या विवाह सोहळा हा एकाच वेळी पार पडणार आहे. या आदर्श उपक्रमासाठी आयोजकांना गवळी समाज बांधवांचे सहकार्य मोठ्या प्रमाणात लाभते. यंदाच्या विवाह सोहळ्याचीही जय्यत तयारी करण्यात आली असून, शादिखाना परिसरात भव्य मंडप उभारण्यात आला आहे.