२४ तास सेवेची सुविधा नावापुरतीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:39 AM2021-05-24T04:39:52+5:302021-05-24T04:39:52+5:30

वाशिम : पशुवैद्यकीय सेवेकरिता मध्यंतरी जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या कामकाजाच्या वेळेत बदल करण्यात आला होता. आकस्मिक प्रसंगी २४ तास ...

24 hours service facility in name only | २४ तास सेवेची सुविधा नावापुरतीच

२४ तास सेवेची सुविधा नावापुरतीच

googlenewsNext

वाशिम : पशुवैद्यकीय सेवेकरिता मध्यंतरी जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या कामकाजाच्या वेळेत बदल करण्यात आला होता. आकस्मिक प्रसंगी २४ तास सेवा उपलब्ध राहणार असल्याचा कांगावा करण्यात आला; मात्र या सुविधेचा बोजवारा उडाला आहे.

...................

‘फिट इंडिया मुव्हमेंट’ योजना ठप्प

वाशिम : केंद्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत ‘फिट इंडिया मुव्हमेंट’ योजनेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याची ‘फिटनेस असेसमेंट टेस्ट’ घेतली जाते; मात्र कोरोना संसर्गामुळे ही योजना पूर्णत: ठप्प असून खेळाडूंचे नुकसान होत आहे.

................

वळणमार्गावर फलक उभारण्याची मागणी

मालेगाव : तालुक्यातील मेडशी येथून अकोलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठा वळणमार्ग आहे. वाहने वळण घेत असताना समोरून येणारी वाहने सहजासहजी दिसत नाहीत. यामुळे दोन्हीकडून फलक असणे आवश्यक आहे. तो उभारण्यात यावा, अशी मागणी सुनील शिंदे यांनी केली.

................

नदीपात्रातील पाण्यात वेगाने घट

जऊळका रेल्वे : रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनाकरिता पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला आहे. यामुळे गावाजवळून वाहणाऱ्या काटेपूर्णा नदीपात्रातील पाण्यात वेगाने घट होत आहे.

..............

बाल संरक्षक समित्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन

वाशिम : बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यातील ७०० गावांमध्ये बाल संरक्षक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. गावात किंवा परिसरात कुठेही बालविवाह होत असल्यास तो रोखण्यासाठी समितीमधील सदस्यांनी पुढे यायला हवे. सदस्यांनी नियमित सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुभाष राठोड यांनी केले आहे.

........................

११० लाभार्थींची नावे शिधापत्रिकांत समाविष्ट

वाशिम : तालुक्यातील ११० लाभार्थींची नावे शिधापत्रिकांमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आली असून, ७० जणांची नावे शिधापत्रिकांमधून वगळण्याची कार्यवाही करण्यात आली आहे, अशी माहिती पुरवठा विभागाचे निरीक्षक नीलेश राठोड यांनी दिली.

.................

पाणीपुरवठा विस्कळीत; नागरिक त्रस्त

वाशिम : जुने शहरातील ध्रुव चौक परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत बनला आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन ते तीन दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. एकबूर्जी जलाशयात पुरेसा जलसाठा उपलब्ध असताना तांत्रिक कारणांमुळे उद्भवलेली ही समस्या निकाली काढावी, अशी मागणी धनंजय गाभणे यांनी केली.

.....................

रिक्त पदे तत्काळ भरण्याची मागणी

वाशिम : जिल्ह्याच्या कृषी विभागात अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची कामे होण्यास विलंब लागत आहे. कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची मागणी शेतकरी रवी भुतेकर यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे सोमवारी केली आहे.

...................

शासकीय कार्यालयांमध्ये खबरदारीचा अभाव

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट अद्याप निवळलेले नाही. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय कार्यालयांनी किमान थर्मल गनद्वारे येणाऱ्या नागरिकांची तपासणी करायला हवी. याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे.

....................

रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे लक्ष देण्याचे आवाहन

वाशिम : शहरामधील सर्व शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये, व्यापारी संकुले व सर्व खासगी इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची सुविधा करून ती कार्यरत राहील, याची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी केले आहे.

.....................

युवतींच्या रक्षणासाठी पोलिसांची मोहीम

वाशिम : युवतींच्या रक्षणासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत जिल्हाभरात प्रभावी जनजागृतीदेखील केली जात असल्याचे दिसत आहे.

...................

हाय मास्ट दिवे अद्याप बंदच

वाशिम : मालेगाव, शिरपूर, रिसोड, सेनगाव, हिंगोली या ४६१ बी राष्ट्रीय महामार्गाचे नूतनीकरण पूर्ण होऊन काही ठिकाणी हाय मास्ट दिवे लावण्यात आले; मात्र विद्युत जोडणी रखडल्याने हे दिवे अद्याप बंदच असल्याचे दिसत आहे.

......................

पोर्टलवर शेतकऱ्यांचे अर्ज अपलोड

वाशिम : कृषिविषयक विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी रितसर महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज अपलोड केलेले आहेत. अद्याप काही शेतकरी यापासून दूर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

..................

रस्ताकामामुळे रहदारी विस्कळित

वाशिम : शहरातील पाटणी चाैकापासून अकोला नाकादरम्यानच्या रस्ता नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे या रस्त्यावर गिट्टी अंथरण्यात आली असून रहदारी विस्कळित होत आहे.

Web Title: 24 hours service facility in name only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.