२४७ ग्रामपंचायतींच्या सत्तेच्या चाव्या महिलांकडे!

By admin | Published: July 14, 2015 02:13 AM2015-07-14T02:13:58+5:302015-07-14T02:13:58+5:30

आरक्षणामुळे राजकीय चित्रे बदलले असून, अनेक इच्छुकांचा हिरमोड.

247 Gram Panchayats power women! | २४७ ग्रामपंचायतींच्या सत्तेच्या चाव्या महिलांकडे!

२४७ ग्रामपंचायतींच्या सत्तेच्या चाव्या महिलांकडे!

Next

शिखरचंद बागरेचा / वाशिम : ग्रामीण भागातील सत्तेचा केंद्रबिंदू असणार्‍या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची प्रत्यक्ष रणधुमाळी सुरू झाली आहे. २0१५-२0२0 या कालावधीत निवडणूक होणार्‍या तब्बल २४७ ग्रामपंचायतींच्या सत्तेच्या चाव्या ५0 टक्के आरक्षणामुळे महिला सदस्यांच्या ताब्यात राहणार आहेत. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमुळे ग्रामीण भागात राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. महिला आरक्षणामुळे आपल्या जागेवर पत्नी, सून, बहीण यांना उभे करण्याच्या तयारीला अनेकजण लागले आहेत. २0१५-२0२0 या दरम्यान होणार्‍या ग्रामपंचायतीच्या एकूण सरपंचपदापैकी एससी प्रवर्गासाठी १00 जागा राखीव आहेत. यापैकी पुरुष ५0 तर महिलांसाठी ५0 जागा राखीव आहेत. वाशिम तालुका १0, कारंजा ९, मंगरुळपीर ८, मानोरा ५, मालेगाव ८ आणि रिसोड तालुक्यातील १0 महिला पदांचा यामध्ये समावेश आहे. एस.टी. प्रवर्गासाठी एकूण ३९ जागा असून, यामध्ये महिलांसाठी २0 जागा आरक्षित आहेत. वाशिम १, कारंजा २, मंगरुळपीर ३, मानोरा ६, मालेगाव ६, रिसोड २ जागा महिलांसाठी राखीव आहेत. ओबीसी प्रवर्गासाठी एकूण १३३ जागा असून महिलांसाठी ६७ जागा आरक्षित आहेत. वाशिम १२, कारंजा १२, मंगरुळपीर १0, मानोरा १0, मालेगाव १२, रिसोड ११ जागा महिलांसाठी राखीव आहेत. खुल्या प्रवर्गासाठी एकूण २२0 जागा असून, महिलांसाठी ११0 जागा राखीव आहेत. वाशिम तालुका १९, कारंजा २३, मंगरुळपीर १६, मानोरा १८, मालेगाव १६, रिसोड १८ जागा महिलांसाठी राखीव आहेत. एससी १00, एस.टी. ३९, ओबीसी १३३ व खुला प्रवर्ग २२0 अशा एकूण ४९२ ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण एप्रिल महिन्यात जाहीर करण्यात आले होते. यापैकी २४७ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. ५0 टक्के महिला आरक्षणामुळे २४७ गावांमध्ये ग्रामपंचायत सत्तेची चावी महिलांच्या हातात राहणार आहे. आरक्षणामुळे राजकीय चित्रे बदलले असून, अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. संबंधित प्रवर्गातील उमेदवाराला खुर्ची सोपवून पडद्याआडून सर्व हालचाली कराव्या लागणार आहेत. सरपंच बनण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असणार्‍या अनेक गावपुढार्‍यांची मात्र यामुळे गोची झाली.

Web Title: 247 Gram Panchayats power women!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.