वाशिम जिल्ह्यातील दलित वस्तीतील २४९ कामे संथगतीने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 08:53 PM2018-02-11T20:53:47+5:302018-02-11T21:05:13+5:30

वाशिम : ग्रामीण भागातील दलित वस्तींमध्ये मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने  समाजकल्याण विभागाने २४९ कामांसाठी साडे नऊ कोटी रुपयांचा निधी आॅक्टोबर महिन्यात संबंधित यंत्रणेकडे वितरित केला. साडेतीन महिन्यानंतरही या कामांना गती आली नाही. दरम्यान, ३१ मार्चपूर्वी कामे पूर्ण करण्याच्या सूचना समाजकल्याण विभागाने संबंधितांना दिल्या आहेत. 

249 works pending in slum area of Washim district! | वाशिम जिल्ह्यातील दलित वस्तीतील २४९ कामे संथगतीने!

वाशिम जिल्ह्यातील दलित वस्तीतील २४९ कामे संथगतीने!

Next
ठळक मुद्देसाडेनऊ कोटींचा निधी कामाला गती देण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ग्रामीण भागातील दलित वस्तींमध्ये मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने समाजकल्याण विभागाने २४९ कामांसाठी साडे नऊ कोटी रुपयांचा निधी आॅक्टोबर महिन्यात संबंधित यंत्रणेकडे वितरित केला. साडेतीन महिन्यानंतरही या कामांना गती आली नाही. दरम्यान, ३१ मार्चपूर्वी कामे पूर्ण करण्याच्या सूचना समाजकल्याण विभागाने संबंधितांना दिल्या आहेत. 
दलित वस्तींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे, मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी समाजकल्याण विभागातर्फे विविध कामे प्रस्तावित केली जातात. अनेक दलित वस्तींमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही तर काही दलित वस्तींमध्ये ये-जा करण्यासाठी सिमेंट रस्ता नाही तसेच पथदिवे, सभागृह आदी सुविधा नसल्याने दलित वस्त्या विकासापासून कोसो दूर आहेत. दलित वस्तींचा विकास साधण्यासाठी तसेच मुलभूत सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील दलित वस्तींमध्ये कामे सूचविण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना सूचना दिल्या होत्या. या सुचनेनुसार २४९ कामांना मंजूरात देण्यात आली. यामध्ये सर्वाधिक कामे मालेगाव तालुक्यात ५२ आहेत. या कामांसाठी १ कोटी ९४ लाख २५ हजार रुपये खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. वाशिम तालुक्यात एकूण ४० कामे असून एक कोटी ६७ लाख ६० हजार रुपये, रिसोड तालु्क्यात ४९ कामे असून दोन कोटी सहा लाख २० हजार रुपये, मंगरूळपीर तालुक्यात ४२ कामे असून एक कोटी ४२ लाख २० हजार रुपये, कारंजा तालुक्यात ३८ कामे असून एक कोटी ३९ लाख ५ हजार तर सर्वात कमी कामे मानोरा तालुक्यात २८ कामांसाठी एक कोटी ४५ हजार रुपयांचा निधी मंजूर आहे. ३० कामांचा अपवाद वगळता अद्याप उर्वरीत कामे पूर्ण झाली नाहीत. ३१ मार्च २०१८ पूर्वी सर्व कामे पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून कामांना गती द्या, अशा सूचना समाजकल्याण विभागाने दिलेल्या आहेत. 
 

Web Title: 249 works pending in slum area of Washim district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.