२५ जणांना अन्नातून विषबाधा
By admin | Published: May 9, 2017 02:17 AM2017-05-09T02:17:21+5:302017-05-09T02:17:21+5:30
दोघींची प्रकृती चिंताजनक : सकाळी शिजवलेले अन्न सेवन केले सायंकाळी.
मंगरूळपीर : तालुक्यातील फाळेगाव येथे सोमवार, ८ मे रोजी २५ महिला-पुरुषांना अन्नातून विषबाधा झाली. रुग्णांना आसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून, दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी, की फाळेगाव येथे ७ मे रोजी एका लग्न समारंभात भोजनासाठी शिजविण्यात आलेले शिल्लक राहिलेले अन्न त्याच दिवशी सायंकाळी काही लोकांनी सेवन केले. त्यामुळे त्यांना विषबाधा झाली. दरम्यान, संबंधिताना संडास, उलटीचा त्रास व्हायला लागला. त्यामुळे उपचारासाठी सर्वांना आसेगाव आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यातील दोघांना पुढील उपचारासाठी वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले असून, इतर २३ रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले. विषबाधा झालेल्या रुग्णांमध्ये दुर्गेश राऊत, लीला भोयर, अश्विनी व्यवहारे, मैना महल्ले, गजानन व्यवहारे, विमल व्यवहारे, गणेश सुर्वे, लक्ष्मी सुर्वे, प्रतिक व्यवहारे, संगिता व्यवहारे, ज्ञानेश्वर व्यवहारे, रुपाली ठाकरे, आरती ठाकरे, गीता व्यवहारे, शीतल गावंडे, दुर्गा व्यवहारे, नथ्थू व्यवहारे, तेजश्री मुळे, मीरा व्यवहारे, केशव व्यवहारे, लक्ष्मी व्यवहारे, रमाकांत व्यवहारे, पुनम कुटे, कल्पना व्यवहारे यांचा समावेश आहे.