जिल्ह्यातील २५ प्राथमिक आरोग्य केंद्रे धोक्याची; तपासणी यंत्रणा सुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:44 AM2021-01-16T04:44:43+5:302021-01-16T04:44:43+5:30

जिल्ह्यातील ग्रामीण भागात वसलेली प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र अशा एकूण १७७ रुग्णालयांना अनेक वर्षांपूर्वी जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने अग्निअवरोधक ...

25 primary health centers in the district under threat; The screening system is sluggish | जिल्ह्यातील २५ प्राथमिक आरोग्य केंद्रे धोक्याची; तपासणी यंत्रणा सुस्त

जिल्ह्यातील २५ प्राथमिक आरोग्य केंद्रे धोक्याची; तपासणी यंत्रणा सुस्त

Next

जिल्ह्यातील ग्रामीण भागात वसलेली प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र अशा एकूण १७७ रुग्णालयांना अनेक वर्षांपूर्वी जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने अग्निअवरोधक यंत्र पुरविलेली आहेत. मात्र, आग लागल्यास या माध्यमातून त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे, याचे प्रशिक्षण कोणालाही देण्यात आलेले नाही किंवा ‘मॉकड्रिल’ही कधी झाल्याचे ऐकिवात नाही. विशेष गंभीर बाब म्हणजे सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमधील अग्निअवरोधक यंत्र आजमितीस कालबाह्य झाली असून, अडगळीत पडून आहेत. त्याची कुठलीच तपासणी गेल्या कित्येक वर्षांपासून झाली नाही. दरम्यान, भंडारा येथील आगीच्या घटनेनंतर आता हा प्रश्न ऐरणीवर आला असून, रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रीक ऑडिट करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. परंतु त्याचाही मुहूर्त नेमका कधी निघणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

.........................

तालुकानिहाय प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र

३७

वाशिम

३२

रिसोड

२५

मालेगाव

२९

मंगरूळपीर

३५

कारंजा

१८

मानोरा

............................

कोट :

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसह उपकेंद्रांचे फायर व इलेक्ट्रीक ऑडिट करण्यासंदर्भात शासनस्तरावरून निर्णय झाला असला तरी त्याच्या मार्गदर्शक सूचना अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. यासंदर्भात अधिकृत आदेश प्राप्त होताच या प्रक्रियेस जिल्ह्यात विनाविलंब सुरुवात करण्यात येईल.

- डॉ. अविनाश आहेर

जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम

Web Title: 25 primary health centers in the district under threat; The screening system is sluggish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.