२५0 शेतक-यांसह ग्रामस्थांचे पाण्यातूनच मार्गक्रमण !
By admin | Published: August 6, 2016 02:08 AM2016-08-06T02:08:14+5:302016-08-06T02:16:30+5:30
वाशिम तालुक्यातील बोरी ते देपूळ या दोन्ही गावाला जोडणा-या पूस नदीवरील नवीन पुलाचे काम रखडले.
देपूळ, (जि. वाशिम), दि. ५ : वाशिम तालुक्यातील बोरी ते देपूळ या दोन्ही गावाला जोडणार्या पूस नदीवरील नवीन पुलाच्या रखडलेल्या कामामुळे खोलगट भागात असलेल्या जुन्या पुलावरुन २५0 शेतकर्यांसह गावकर्यांना आपल्या कामासाठी मार्गक्रमण करावे लागत आहे. गत आठवड्यापासून जोरदार झालेल्या पावसाने ४ ते ५ फूट उंची पाणी असल्याने शेतकर्यांना शेतीतील कामांवर जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. वारा जहागीर सिंचन प्रकल्पाचे काम लघू पाटबंधारे योजना विभाग क्रमांक तीनच्या अधिपत्याखाली झाले. येथून जाणार्या नवीन पुलाची उंची वाढवून काम सुरु आहे, हे अनेक वर्षांपासून सुरु आहे. त्यामुळे परिसरातील लोकांना जुन्या पुलावरुनच मार्गक्रमण करावे लागते. सद्यस्थितीत जुन्या पुलाच्यावरून ४ ते ५ फूट पाणी वाहत असल्याने शेतकर्यांना शेतीच्या कामांसाठी व नागरिकांनाही बाहेरगावी जाण्यासाठी या पाण्यातूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. वारा सिंचन प्रकल्पाच्या बुडित क्षेत्राखाली बोरी ते देपूळ रस्त्यावरील पूल येणार असल्याची कल्पना असल्याने या पुलाला पर्यायी पूल देण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेकडे १ कोटी ३३ लाखाचा निधी गत दोन वर्षांपूर्वी वळता केला; परंतु या पुलाचे काम संबंधित यंत्रणेने ठराविक मुदतीत केले नाही. या पुलाचे ३0 टक्के काम अपूर्ण आहे. त्यामुळे या पुलावरुन ये-जा करणे शक्य नाही. नाइलाजास्तव शेतकरी व ग्रामस्थांना जुन्या पुलाचा वापर करावा लागत आहे.