जिल्ह्यातील ३० अंगणवाड्यांसाठी २.५५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:43 AM2021-05-27T04:43:42+5:302021-05-27T04:43:42+5:30

जिल्ह्यात अनेक गावात चिमुकल्यांच्या अंगणवाडीसाठी इमारतीची सोय नाही. काही ठिकाणी झाडाखाली अंगणवाडी भरते ही बाब लक्षात घेऊन खासदार गवळी ...

2.55 crore for 30 Anganwadas in the district | जिल्ह्यातील ३० अंगणवाड्यांसाठी २.५५ कोटी

जिल्ह्यातील ३० अंगणवाड्यांसाठी २.५५ कोटी

Next

जिल्ह्यात अनेक गावात चिमुकल्यांच्या अंगणवाडीसाठी इमारतीची सोय नाही. काही ठिकाणी झाडाखाली अंगणवाडी भरते ही बाब लक्षात घेऊन खासदार गवळी यांनी निती आयोगाकडे अंगणवाडीसाठी निधीची मागणी केली होती. पाठपुरावा केल्याने निती आयोगाने जिल्ह्यातील ३० अंगणवाड्यांसाठी २.५५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. यामध्ये वाशिम तालुक्यातील सुपखेला, साखरा, आसोला जहा, तोंडगाव, मंगरूळपीर तालुक्यातील धानोरा बु., जांब, साळंबी, मानोली, कंझरा, मानोरा तालुक्यातील अजनी, तोरनाळा, देऊळवाडी, शिवनी, रणजीतनगर, चोंडी, कारंजा तालुक्यातील अंबोर्डा, मालेगाव तालुक्यातील जउळका, डव्हा, गिव्हा कुटे, सिरसाळा, रिसोड तालुक्यातील चिंचाबा, नंधाना, तांदूळवाडी, केनवड, कोयाळी बु., तपोवन, व्याड, जायखेड, रिठद १, रिठद २ या गावांचा समावेश आहे. यामध्ये प्रतिअंगणवाडी बांधकामासाठी ८.५० लक्ष रुपये मंजूर झाले आहेत.

Web Title: 2.55 crore for 30 Anganwadas in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.