महिला बचत गटांना २५.७0 लाखांचे कर्जवाटप
By Admin | Published: July 3, 2014 11:16 PM2014-07-03T23:16:48+5:302014-07-04T00:05:35+5:30
महिला बचत गटांना सुमारे २६ लाख ७0 हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले.
वाशिम: महिलांचे जिवनमान उंचावे या उदात्त हेतूने गरजू महिला बचत गटांना विविध उद्योगासाठी नाबार्ड फायनान्स व स्वयं शासन बहुउद्देशीय महिहला विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जिल्हयातील महिला बचत गटांना सुमारे २६ लाख ७0 हजार रुपयांचे कर्ज स्वयं. शासन बहुउद्देशीय महिला विकास संस्थेचे संचालक माधवराव इंगोले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
सदर कर्ज वाटप कार्यक्रमांतर्गत मानोरा तालुक्यातील विठोली येथील लहानूजी महिला बचत गटास दोन लाख रुपये, दापूरा येथील ज्ञानाई महिला बचत गटास एक लाख, प्रगती महिला बचत गटास तीन लाख, वाशिम तालुक्यातील संत गजानन महाराज बचत गटास तीन लाख, सावित्रीबाई फुले महिला बचत गट काजळंबा दिड लाख,बालाजी महिला बचत गट काळे फैल तीन लाख, कोंडेश्वर महिला बचत गट काळे फैल तीन लाख, चामुंडा देवी माता महिला बचत गट तीन लाख ९0 हजार, दुर्गामाता महिला बचत गटास चार लाख ८0 हजार, पंचशिल महिला बचत गट ब्राम्हणवाडा एक लाख ५0 हजार, असे एकूण २६ लाख ७0 हजार रुपयांचे कर्ज नाबार्ड फायनान्स व स्वयंशासन बहुउद्देशीय विकास संस्थेच्या तवीने वाटप करण्यात आले. याप्रसंगी स्वयं शासन बहुउद्देशीय महिला विकास संस्थेचे संचालक माधवराव इंगोले, नाबार्डचे फायनान्सचे प्रविण शिंदे, नाबार्ड फायनान्स चे जिल्हा समन्वयक पंकज चव्हाण, नरेंद्र पवार, ज्योत्स्ना पुरी, आशा सोनुने, खुळे, बारसे, वासे, उपस्थित होते. नाबड्रचे सहायक व्यवस्थापक प्रदिप पराते, यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेवून सर्व बचत गटांनी कर्ज मागणीचे प्रस्ताव सादर करावे असे आवाहन संस्था संचालक माधवराव इंगोले यांनी केले.