२.६२ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, पोलिसांची विशेष मोहीम
By दिनेश पठाडे | Published: August 31, 2022 05:49 PM2022-08-31T17:49:57+5:302022-08-31T17:50:30+5:30
महाराष्ट्र शासनाकडून प्रतिबंधित असलेल्या वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा जप्त करण्यासाठी मंगळवारी ठिकठिकाणी विशेष मोहीम राबविण्यात आली.
वाशिम : जिल्ह्यात अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्यांना पायबंध घालण्याकरिता ३० ऑगस्ट रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली. पोलिसांनी ६ ठिकाणी धडक कारवाई करून २.६२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यातील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाकडून प्रतिबंधित असलेल्या वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा जप्त करण्यासाठी मंगळवारी ठिकठिकाणी विशेष मोहीम राबविण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने पो.स्टे.वाशिम शहर हद्दीत ३९३९५ रुपयांचा गुटखा जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कामरगाव येथे ६०९८१ रुपयांचा, पो.स्टे.शिरपूर अंतर्गत चांडस येथे १ लाख २४ हजार ८०० रुपये, पो.स्टे.मंगरूळपीर अंतर्गत कोष्टीपुरा येथे ३३३००रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. तर पो.स्टे.मानोरा अंतर्गत शेंदोना येथे दोन कारवायांमध्ये ४,११२ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. एकूण ६ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तसेच सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने कायद्यान्वये एकूण २५ केसेस करून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनात अपर पोलीस अधीक्षक गोरख भामरे, स्थानिक गुन्हे शाखा तसेच सर्व पोलीस स्टेशन यांचे पथकाने कारवाई केली. अशा प्रकारची काही तक्रार असल्यास नियंत्रण कक्षास माहिती द्यावी त्या इसमाचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी केले.