नवोदय विद्यालयात नववीच्या दोन जागांसाठी २६६ अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 02:54 PM2020-01-25T14:54:05+5:302020-01-25T14:54:51+5:30
अंतिम मुदतीपर्यंत तब्बल २६६ अर्ज प्राप्त झाले असून, जवाहर नवोदय विद्यालय वाशिम येथे ८ फेब्रुवारी रोजी ही प्र्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत चालविल्या जाणाऱ्या नवोदय विद्यालयात नववीमध्ये प्रवेश देण्याकरिता ८ फेब्रुवारी रोजी प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. नववीतील रिक्त दोन जागेसाठी तब्बल २६६ अर्ज प्राप्त झाले आहेत.
जवाहर नवोदय विद्यालयात नववीच्या वर्गात प्रवेश देण्यासाठी नवोदय प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात येते. ग्रामीण भागातील गुणवंत, होतकरू विद्यार्थ्यांना या नवोदय विद्यालयामुळे चांगली प्रेरणा मिळते. गेल्या काही वर्षांपासून या परीक्षेला ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने बसत आहेत. नववी वर्गातील दोन रिक्त जागेसाठी पात्र विद्यार्थ्यांकडून आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. अंतिम मुदतीपर्यंत तब्बल २६६ अर्ज प्राप्त झाले असून, जवाहर नवोदय विद्यालय वाशिम येथे ८ फेब्रुवारी रोजी ही प्र्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ज्या संकेतस्थळावरुन परीक्षेसाठी अर्ज भरले आहेत, त्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना परीक्षासाठीचे प्रवेश पत्र उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
(प्रतिनिधी)
नवोदय प्रवेश परीक्षेसाठी जिल्ह्यातील २६६ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरले असून, संकेतस्थळावर प्रवेशपत्र उपलब्ध आहेत. नवोदय विद्यालयाच्या संकेतस्थळावरही प्रवेश पत्र उपलब्ध आहेत. ८ फेब्रुवारी रोजी ही परीक्षा नवोदय विद्यालय वाशिम या केंद्रावर होणार असून, संबंधित विद्यार्थ्यांनी सकाळी ९.३० पूर्वी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे.
- आर.एस. चंदनशीव
प्राचार्य नवोदय विद्यालय