खासगी अनुदानित शाळांसाठी २६७ कोटी रुपये वेतनेतर अनुदान मंजुर; २६ काेटींचा हप्ता वितरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:44 AM2021-09-03T04:44:04+5:302021-09-03T04:44:04+5:30
खासगी अनुदानित शाळांसाठी वेतनाच्या बारा टक्के वेतनेतर अनुदान दिले जावे अशी तरतूद आहे. मात्र मागील बऱ्याच वर्षांपासून शासन वेतनेतर ...
खासगी अनुदानित शाळांसाठी वेतनाच्या बारा टक्के वेतनेतर अनुदान दिले जावे अशी तरतूद आहे. मात्र मागील बऱ्याच वर्षांपासून शासन वेतनेतर अनुदान देत नाही. जे दिले जाते ते सुद्धा अल्प प्रमाणात दिले जाते. हे वेतनेतर अनुदान २०१९-२० या शैक्षणिक सत्रापासून थकलेले होते. यासाठी शिक्षण संस्था चालक महामंडळ तथा अमरावती विभागाचे शिक्षक आमदार ॲड. किरणराव सरनाईक यांनी सततची मागणी केली होती. अखेर या मागणीला महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मान्यता दिली असून २६७ कोटी रुपये वेतनेतर अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
तसेच यातील पहिला हप्ता म्हणून २६ कोटी रुपये वितरितसुद्धा करण्यात आलेले आहेत. शिक्षण संस्था चालक महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील, आमदार ॲड. किरणराव सरनाईक, माजी आमदार विजयराव गव्हाणे, रवींद्र फडणवीस, आप्पासाहेब बालवडकर आदींच्या प्रयत्नांमुळे हे वेतन अनुदान मंजूर करण्यात आले आहे.