आशा गट प्रवर्तकाच्या एका जागेसाठी २७ अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 03:30 PM2019-07-02T15:30:13+5:302019-07-02T15:30:44+5:30
वाशिम : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हास्तरीय आशा गटप्रवर्तकाच्या एका जागेसाठी २७ अर्ज प्राप्त झाले असून, पात्र, अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हास्तरीय आशा गटप्रवर्तकाच्या एका जागेसाठी २७ अर्ज प्राप्त झाले असून, पात्र, अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीवर ८ जुलैपर्यंत आक्षेप मागविण्यात आले आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हास्तरीय आशा गटप्रवर्तकाचे एक पद भरण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातून २७ अर्ज प्राप्त झाले आहेत. सदर पदासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील निकषानुसार उमेदवाराची अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पात्रता असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्जासोबत सादर केलेल्या शैक्षणिक कागदपत्रानुसार उमेदवारांचे अर्ज पात्र, अपात्र ठरविण्यात आले आहेत. पात्र व अपात्र यादी प्रसिद्ध करण्यात असून, २७ अर्ज पैकी ११ अर्ज अपात्र ठरले आहेत. या यादीवर ८ जुलै २०१९ पर्यंत आरोग्य विभागाने आक्षेप मागविले आहेत. आक्षेप नोंदविताना शैक्षणिक व तांत्रिक अर्हता ही अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापूर्वी धारण केलेली असणे आवश्यक आहे. ८ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजतानंतर प्राप्त होणारे आक्षेप ग्राह्य धरले जाणार नाहीत, असा इशाराही आरोग्य विभागाने दिला.