अनुदान घेऊन शौचालय न बांधणा-या 27 लाभार्थ्यांची पोलिसात तक्रार
By admin | Published: December 29, 2016 03:43 PM2016-12-29T15:43:22+5:302016-12-29T15:43:22+5:30
स्वच्छ भारत अभियानांतर्गत अनुदान घेऊनही शौचालय न बांधणा-या लाभार्थ्यांवर नगरपालिकेने कारवार्इंचा बडगा उगारला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 29 - नगर पालिकेच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत अनुदान घेऊनही शौचालय न बांधणा-या लाभार्थ्यांवर नगरपालिकेने कारवार्इंचा बडगा उगारला आहे. शहरातील अशा 27 लाभार्थ्यांची पालिकेने पोलिसात तक्रार दिली आहे. यामुळे शौचालयाचे अनुदान घेऊन बांधकाम न करणा-या लाभार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
येथील नगर पालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात विविध उपक्रम राबविले, तसेच शौचालयाचे महत्व पटवून देत घरोघरी जावून मार्गदर्शन केले. याच बरोबर या अभियानांतर्गत मार्च, एप्रिल व ऑक्टोबर 2016 पूर्वी शौचालय बांधण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना तीन टप्यात अनुदान दिले. परंतु अनुदान घेऊनही शौचालय न बांधणा-या लाभार्थ्यांचा शोध पालिकेच्या अधिकारी, कर्मचा-यांनी घेतला असता.
आतापर्यंत 27 लाभार्थी आढळलेत. या लाभार्थ्यांची पालिकेतर्फे पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे शासनाच्या निधीचा दुरुपयोग केल्याने या लाभार्थ्यांवर कारवाई होण्याची शक्यता असल्याने लाभार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सध्या शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधण्याच्या कार्याला वेग आला असून याकरिता नगर पालिकेचे अधिकारी कर्मचारी अथक परिश्रम घेत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे.