जिल्ह्यातील २७ जणांनी काढले विदेशाचे ‘लायसन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:26 AM2021-07-09T04:26:14+5:302021-07-09T04:26:14+5:30

वाशिम उपप्रादेशिक परिवहन विभागाने मागील दहा वर्षे तीन महिन्यांत २७ व्यक्तिंना इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स दिले आहे. त्यामुळे या व्यक्तिंना ...

27 people in the district get foreign 'licenses' | जिल्ह्यातील २७ जणांनी काढले विदेशाचे ‘लायसन’

जिल्ह्यातील २७ जणांनी काढले विदेशाचे ‘लायसन’

Next

वाशिम उपप्रादेशिक परिवहन विभागाने मागील दहा वर्षे तीन महिन्यांत २७ व्यक्तिंना इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स दिले आहे. त्यामुळे या व्यक्तिंना परदेशातही वाहतुकीचे नियम पाळत वाहन चालविण्याची मुभा मिळाली आहे. शिक्षण आणि नोकरीच्या कारणामुळे अनेक व्यक्ती विदेशात जातात. यापैकी काही व्यक्ती इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्ससाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे रितसर आवेदन सादर करतात. याच आवेदकांची प्रकरणे अवघ्या ७२ तासांत निकाली काढून विदेशात जाणाऱ्यांना व रितसर इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स प्राप्त करू इच्छिणाऱ्यांना परदेशातही वाहन चालविण्याचा परवाना दिला जात आहे. मागील दहा वर्षे सात महिन्यांत वाशिम येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाने २७ व्यक्तिंना इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स दिले असून, सर्वाधिक इंटरनॅशनल लायसन्स सन २०१७-१८ व २०१४-१५ या वर्षांत देण्यात आली आहेत.

---------------

बॉक्स: आवेदनासोबत हवी ही कागदपत्रे

इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आवेदन करताना आवेदकाला विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून आवेदनासोबत भारतीय व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, व्हिसा आदी कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडणे गरजेचे आहे.

-----------------

बॉक्स: एक वर्षाची राहते मुदत

रितसर आवेदन सादर करून इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स मिळविणाऱ्यांची प्रकरणे अवघ्या ७२ तासांत निकाली काढली जात असून, या लायसन्सचा कालावधी एक वर्षांचा राहात असल्याचे सांगण्यात आले, तर त्यानंतर हे लायसन्स रिनिव्हल करता येते.

--------------

कोट: गत दहा वर्षे सहा महिन्यांच्या काळात २७ व्यक्तींनी इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स काढले आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे प्राप्त झालेली इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्सची प्रकरणे जास्तीत जास्त ७२ तासांत निकाली काढली जातात.

- ज्ञानेश्वर हिरडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम

----------

१) किती जणांनी काढले इंटरनॅशनल लायसन्स? (ग्राफ)

२०११ - ०१

२०१२ - ०२

२०१३ - ०१

२०१४ - ०३

२०१५ -०४

२०१६ -०२

२०१७ -०४

२०१८ -०४

२०१९ -०२

२०२० -०२

२०२१ (जूनपर्यंत) -०२

------------------------

Web Title: 27 people in the district get foreign 'licenses'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.