२७४ ग्रा.पं.मध्ये ‘आपले सरकार’ सेवा कार्यान्वित!
By admin | Published: March 17, 2017 02:43 AM2017-03-17T02:43:02+5:302017-03-17T02:43:02+5:30
ग्रामस्थांची सोय; महत्त्वाचे दस्तावेज मिळताहेत वेळेवर
वाशिम, दि. १६- ग्रामविकास विभागाच्या संकल्पनेतून साकारलेल्या ह्यआपले सरकार सेवा केंद्रह्ण उपक्रमामुळे अनेक प्रकारचे महत्त्वाचे दस्तावेज गावातच मिळू लागल्याने ग्रामस्थांची सोय झाली आहे. वाशिम जिल्हय़ात ४९३ पैकी २७४ ग्रामपंचायतींमध्येही ही सुविधा कार्यान्वित झाली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) प्रमोद कापडे यांनी बुधवार, १५ मार्च रोजी दिली.
सहकारी संस्थांची नोंदणी करणे, सहकारी संस्थांची उपविधी दुरुस्त करणे, सावकारी व्यवसायाकरिता परवाना देणे, परवाना नूतनीकरण करणे, सहकारी गृहनिर्माण संस्थांचे मानवी अधिहस्तांतरण यासह ग्रामपंचायती अंतर्गत पुरविल्या जाणार्या विविध प्रकारच्या सेवा नागरिकांना ग्रामस्तरावरच उपलब्ध करून देण्यासाठी सहकारी, पणन व वस्त्रोद्योग विभागाने ह्यआपले सहकार सेवा केंद्रह्ण, हा उपक्रम हाती घेतला आहे. यापूर्वी राबविण्यात आलेल्या ह्यसंग्रामह्ण कार्यप्रणालीप्रमाणेच या नव्या उपक्रमाचे स्वरूप असणार असून ह्यसंग्रामह्णसाठी दिलेले संगणक, पिंट्रर यासह इतर साहित्य ग्रामपंचायतींना हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सध्या जोरासोरात सुरू आहे.
ह्यआपले सरकार सेवा केंद्रह्ण या केंद्र शासनाच्या उपक्रमात जिल्हय़ातील ४९३ अर्थात सर्वच ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला असून आतापर्यंंत त्यातील २७४ ग्रामपंचायतींना नागरिकांना विविध स्वरूपातील दस्तावेज उपलब्ध करून देण्यासाठी लागणारे सर्व साहित्य पुरविण्यात आल्याची माहिती कापडे यांनी ह्यलोकमतह्णला दिली.