२८ गावे पाणी पुरवठा योजना पूर्ववत
By admin | Published: June 6, 2017 07:19 PM2017-06-06T19:19:26+5:302017-06-06T19:19:26+5:30
पाणी पुरवठा योजना पुर्ववत झाल्याने नागरिकांनी सोडला सुटकेचा श्वास
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रभाव लोकमतचा
मानोरा :तालुक्याला पाणी पुरवठा करणारी २८ गावे पाणी पुरवठा योजना १ कोटी २७ लाख रुपये पाणीकर थकल्याने जिवन प्राधीकरणाने १ मे पासून सदर योजना बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पाणी पुरवठा योजना बंद झाल्याने योजनेत समाविष्ट गावांचा घसा कोरडा झाला होता. प्रकरणाची दखल घेत लोकमतने २८ गावे पाणी पुरवठा योजना बंद प्रतिनिधी लक्ष देण्याची देण्याची गरज या मथळल्याखाली २ मे रोजी वृत्त प्रकाशीत केले होते. वृत्ताची दखल घेत कारंजा - मानोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी योग्य शिष्टाई करत पाणी पुरवठा योजना पुर्ववत करण्यात आली.
नागरिकांना मानले लोकमतचे आभार
तालुक्यासाठी अतिशय महत्वकांक्षी असलेली २८ गावे पाणी पुरवठा योजना पाणी कर थकल्याने सदर योजना तोटयात चालवणे अशक्य असल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्यावतीने ३१ मेपासून ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला होता.पाणी पुरवठा योजना बंद झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. शिवाय नागरिकांना दुषीत पाण्याचा सामना करावा लागत होता.त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. ही गंभीर बाबीचा लोकमतने वृत्त प्रकाशीत केले. या वृत्ताची दखल घेत आमदार राजेंद्र पाटणी यांनी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाचे कार्यकारी अभियंता कैलास जीवनने यांच्याशी चर्चा करुन १५ पर्यंत टाकीत पाणीकर ची तरतुद मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्याशी चर्चा करुन उपलब्ध करुन देण्यात येईल अशा सुचना केल्या.त्यामुळे आमदार पाटणी यांच्या विनंतीला मान देवुन सदर पाणी पुरवठा योजना पुर्ववत करण्यात आली.
२८ गावे पाणी पुरवठा योजना ही मानोरा तालुका यासाठी वरदान आहे. ही योजना कायम स्वरुपी सुरु राहावी यासाठी नागरिकांनी १५ जुनपर्यंत आपले थकीत पाणीकर भरुन सहकार्य करावे.
- भानु भिका जाधव, सरपंच कारखेडा
अकोला जिल्हा परिषदने माजीप्रा साठी अकोट तालुक्यातील ८४ गावासाठी ३२ लाख रुपये दिले.त्याच धर्तीवर वाशिम जिल्हा परिषदेने माजीप्राकडे निधी भरावा जेणे करुन सदर योजना चालवणे शक्य होईल.
- कैलास जिवने, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण