जिल्ह्यात नव्याने आढळले २९ कोरोना बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:28 AM2021-06-26T04:28:16+5:302021-06-26T04:28:16+5:30
एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत ७ हजारांवर कोरोना बाधित रुग्ण आढळले. त्यानंतर मात्र ...
एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत ७ हजारांवर कोरोना बाधित रुग्ण आढळले. त्यानंतर मात्र सातत्याने रुग्णसंख्येचा आलेख वाढत राहिला. १ जूनपासून दुसरी लाट ओसरत चालल्याचे दिसून येत आहे; मात्र २५ जूनअखेर संसर्गाने बाधित एकूण रुग्णांचा आकडादेखील ४१ हजार ३४४ वर पोहोचला आहे. सध्या २८२ रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत कोरोना संसर्गाने ६१७ जणांना जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, आज नव्याने आढळलेल्या २९ रुग्णांमध्ये वाशिम तालुक्यातील ४, मालेगाव तालुक्यातील ४, रिसोड ६, मंगरूळपीर ७, कारंजा २ आणि मानोरा तालुक्यातील २ रुग्णांचा समावेश आहे. मे २०२१ मध्ये कोरोना संसर्गाने झालेल्या दोन मृत्यूंची आज पोर्टलवर नोंद घेण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून कळविण्यात आली.
.................
कोरोना बाधितांची सद्य:स्थिती
एकूण पॉझिटिव्ह – ४१,३४४
ॲक्टिव्ह – २८२
डिस्चार्ज – ४०,४४४
मृत्यू – ६१७