२९ हजार शेतकऱ्यांना मिळणार नुकसानभरपाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:46 AM2021-08-13T04:46:52+5:302021-08-13T04:46:52+5:30

संतोष वानखडे वाशिम : जानेवारी, फेब्रुवारी २०२१ या कालावघीत अमरावती विभागात गारपीट व अवेळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाची भरपाई ...

29,000 farmers to get compensation | २९ हजार शेतकऱ्यांना मिळणार नुकसानभरपाई!

२९ हजार शेतकऱ्यांना मिळणार नुकसानभरपाई!

Next

संतोष वानखडे

वाशिम : जानेवारी, फेब्रुवारी २०२१ या कालावघीत अमरावती विभागात गारपीट व अवेळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाची भरपाई २९ हजार शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे. यासाठी २३.३९ कोटींचा निधी शासनाकडून ११ ऑगस्ट रोजी मिळाला आहे.

शेतकऱ्यांना दरवर्षी नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागते. गारपीट व अवेळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसतो. राज्यात जानेवारी, फेब्रुवारी २०२१ या महिन्यांत गारपीट व अवेळी पावसामुळे ४२ हजार ६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये अमरावती विभागातील २९ हजार ५०७ शेतकऱ्यांच्या २२ हजार ६३८ हेक्टर शेतातील पीक नुकसानाचा समावेश आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नुकसानभरपाईची रक्कम मिळण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूरही उमटला होता. नुकसानभरपाईची रक्कम तातडीने देण्यात यावी, अशी मागणी सर्वच स्तरांतून झाली. अखेर ११ ऑगस्ट रोजी नुकसानभरपाई म्हणून राज्यातील ६९ हजार बाधित शेतकऱ्यांसाठी ४७ कोटी ८३ लाख ५२ हजार रुपयांचा निधी मिळाला असून, यामध्ये अमरावती विभागातील २९५०७ शेतकऱ्यांना २३ कोटी ३९ लाख ४७ हजार रुपये निधी मिळणार आहे.

Web Title: 29,000 farmers to get compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.