१५ दिवसांत २९४ रोहित्रांत बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:27 AM2021-06-23T04:27:12+5:302021-06-23T04:27:12+5:30

वाशिम जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक आणि कृषीपंपांना वीजपुरवठा करण्यासाठी १० हजार रोहित्र बसविण्यात आले आहेत. वेगवेगळ्या वीज उपकेंद्रांतर्गत वेगवेगळ्या फिडरवर ...

294 Rohitras fail in 15 days | १५ दिवसांत २९४ रोहित्रांत बिघाड

१५ दिवसांत २९४ रोहित्रांत बिघाड

Next

वाशिम जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक आणि कृषीपंपांना वीजपुरवठा करण्यासाठी १० हजार रोहित्र बसविण्यात आले आहेत. वेगवेगळ्या वीज उपकेंद्रांतर्गत वेगवेगळ्या फिडरवर हे रोहित्र बसवून सुरळीत वीजपुरवठा देण्याची कसरत महावितरणला करावी लागत आहे. सततच्या कमी-अधिक दाबासह वादळीवारा आणि पावसामुळे रोहित्रांत बिघाड होण्याच्या घटना जिल्ह्यात वारंवार घडतात. रोहित्रांतील बिघाडाचे वार्षिक प्रमाण सरासरी १५ टक्के आहे. त्यात सप्टेंबर ते डिसेंबर या प्रकारांत लक्षणीय वाढ होते. या काळात महिन्याला ७०० ते ८०० रोहित्र बिघाडाने बंद पडतात. पावसाळ्याच्या दिवसांतही असे प्रकार बऱ्याच ठिकाणी घडतात. त्यात गत १५ दिवसांतच २९४ रोहित्र नादुरुस्त झाले असून, ग्रामस्थ व व्यावसायिकांची अडचण दूर करण्यासाठी महावितरणने त्यापैकी २७७ रोहित्र दुरुस्तही केल्याची माहिती महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली.

---------------

थकबाकीमुळे १७ रोहित्रांची दुरुस्ती प्रलंबित

वाशिम जिल्ह्यात महावितरणची ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी वाढली असून, जिल्ह्यासाठी ७५.७९ कोटी वसुलीचे उद्दिष्टच या महिन्याच्या सुरुवातीला ठरवून देण्यात आले होते. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणची धडपड सुरू आहे. त्यामुळेच व्यावसायिक आणि वाणिज्यिकसह कृषी फिडरवरील नादुरुस्त रोहित्र थकबाकी भरल्यानंतरच दुरुस्त करून बसविले जात आहेत. यामुळेच १७ रोहित्रांची दुरुस्ती प्रलंबित आहे.

------------------

थकबाकी वसुलीस वेग

ज्या घरगुती, वाणिज्य, औद्योगिक, कृषी पंप वीज ग्राहकांचे वीज बिल थकीत आहे अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे. गतवर्षी मार्चमध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन झाला. तेव्हापासून ग्राहकांकडून वीजबिल भरण्याकडे दुर्लक्ष होत आहे. आता वाशिम जिल्हा अनलॉक झाल्यानंतर थकबाकी वसुलीस महावितरणने वेग दिला आहे.

--------

कोट: सप्टेंबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या तुलनेत पावसाळ्यात रोहित्र बिघाडाचे प्रमाण कमी असते. तथापि, गत १५ दिवसांत २९४ रोहित्रांत वादळीवारा, पावसामुळे बिघाड झाला. ग्रामस्थ आणि व्यावसायिकांची अडचण लक्षात घेता त्यापैकी २७७ दुरुस्तही करण्यात आले असून, रोहित्र दुरुस्त करून ऑईल उपलब्ध करण्यासह रोहित्र बसविले जात आहेत.

-आर.जी. तायडे

कार्यकारी अभियंता,

महावितरण, वाशिम

-----------------------

तालुकानिहाय नादुरुस्त रोहित्र

तालुका - नादुरुस्त -दुरुस्ती प्रलंबित

वाशिम - ४९ - ४८ - ०१

मालेगाव - ५६ - ५० -०६

रिसोड -७९ -७७ -०२

मंगरुळपीर -२८ -२८ -००

मानोरा -३४ -२९ -०५

कारंजा -४८ -४५ -०३

-------------------------

एकूण २९४ -२७७ -१७

--------------------------

Web Title: 294 Rohitras fail in 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.