जिल्ह्यात ३ तालुके कोरोनामुक्तीच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:53 AM2021-06-16T04:53:49+5:302021-06-16T04:53:49+5:30

जिल्ह्यातील फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत कोरोना संसर्गाचा उद्रेकच झाला. कोरोना संसर्गाच्या या दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी ते मे २०२१ दरम्यान ...

3 talukas in the district on the path of coronation | जिल्ह्यात ३ तालुके कोरोनामुक्तीच्या वाटेवर

जिल्ह्यात ३ तालुके कोरोनामुक्तीच्या वाटेवर

Next

जिल्ह्यातील फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत कोरोना संसर्गाचा उद्रेकच झाला. कोरोना संसर्गाच्या या दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी ते मे २०२१ दरम्यान ३२ हजारांहून अधिक लोकांना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी ४२४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या लाटेने जिल्ह्यातील ६८७ गावांना कवेत घेतले होते. अशात कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर निर्बंध लावले. प्रवासी वाहतूक नियंत्रित केली. जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या. त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आणि बाधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागली. आरोग्य विभागाच्या १३ जूनच्या अहवालानुसार जिल्ह्यात केवळ ६४२ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात सर्वाधिक रुग्ण वाशिम आणि रिसोड तालुक्यातील आहेत, तर मानोरा तालुक्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सर्वात कमी आहे. मानोरा आणि मंगरूळपीर तालुक्यातही अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४० पेक्षा कमीच आहे. त्यामुळे या तालुक्यांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसत आहे.

--------

एकूण चाचण्या ३,०४, १६७

-----

बाधित होण्याचे प्रमाण -०५ टक्के

-------------

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण -९५ टक्के

-------------

एकूण रुग्ण -४१,०२९

बरे झालेले रुग्ण -३९,७८६

उपचार घेत असलेले -६४२

मृत्यू -६००

---------------

तालुकानिहाय अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

वाशिम- २९७

रिसोड- २१५

कारंजा- ४९

मं. पीर- ३९

मानोरा- ३१

मालेगाव- ११

----------

वाशिम तालुक्यात संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक

जिल्ह्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत आहे. प्रत्येक तालुक्यात बाधितांचे प्रमाण कमी होत असून, बरे होणाऱ्यांची संख्याही आता वाढत आहे. तथापि, जिल्हा मुख्यालय असलेल्या वाशिम तालुक्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत अद्यापही कोरोना संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक असून, या तालुक्यात सद्य:स्थितीत २९७ रुग्ण उपचार घेत आहेत.

Web Title: 3 talukas in the district on the path of coronation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.