वाशिम जिल्ह्यात ३० हवामान केंद्र कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 07:12 PM2017-07-18T19:12:07+5:302017-07-18T19:12:07+5:30

वाशिम: कृषी विभागातर्फे जिल्ह्यात स्वयंचलित ४६ पैकी ३० महसूल मंडळात हवामान केंद्र उभारण्याचे काम पूर्ण झाले असून, ही हवामान केंद्रं कार्यान्वित झाली आहेत.

30 Climate Centers implemented in Washim district | वाशिम जिल्ह्यात ३० हवामान केंद्र कार्यान्वित

वाशिम जिल्ह्यात ३० हवामान केंद्र कार्यान्वित

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: कृषी विभागातर्फे जिल्ह्यात स्वयंचलित ४६ पैकी ३० महसूल मंडळात हवामान केंद्र उभारण्याचे काम पूर्ण झाले असून, ही हवामान केंद्रं कार्यान्वित झाली आहेत. त्यामुळे या केंद्रांद्वारे शेतकऱ्यांना हवामानाची अद्ययावत माहिती मिळणे आता शक्य होणार आहे.
महावेध प्रकल्पांतर्गत स्वयंचलित हवामान केंद्र हे राज्य शासन आणि स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रा.लि. यांच्या खासगी भागीदारीतून कृषी विभागामार्फत तयार करण्यात आले आहे. यासाठी ह्यवेध हवामानाचा, ध्यास शेतकरी कल्याणाचाह्ण या ब्रीद वाक्याप्रमाणे या स्वयंचलित हवामान केंद्राच्या माध्यमातून ५ गोष्टींची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे. यात पाऊस, हवेची दिशा, हवेची गती, तापमान व आर्द्रता यांची प्रत्येक तासागणीक माहिती महावेधच्या पुणे, मुंबई, नोएडा येथील कार्यालयांना प्राप्त होईल. या माहितीमुळे वाशिम जिल्ह्यातील ४६ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे. त्यामधील ३० महावेध स्वयंचलित हवामान केंद्र सुरू होऊन या भागातील माहिती संकलित करण्याचे कामही सुरू झाले आहे. या हवामान केंद्राला पर्जन्यमापक (रेन गेज) बसविण्यात आले असून, किती पाऊस झाला, ही माहितीही कळणार आहे. हवामान केंद्राला जीपीआरएस सिस्टिम असून यासंदभार्तील सर्व माहिती संकलित होऊन मुख्यालयास वेळ निश्चित केल्यानुसार कळणार आहे. या केंद्रात बॅटरी चार्जिंगसाठी सोलर प्लेट बसविण्यात आली आहे, तसेच एरिअलने जीपीआरएस सिस्टिमला देण्यात आला आहे. सर्वात उंचावर अल्ट्रासॉनिक बसविण्यात आले आहे. यामुळे हवेची दिशा व गती त्याचबरोबर तापमान व आर्द्रता कळणार आहे.

 

Web Title: 30 Climate Centers implemented in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.