३० प्रशिक्षणार्थींना मिळाला रोजगार !

By Admin | Published: May 26, 2017 07:14 PM2017-05-26T19:14:58+5:302017-05-26T19:14:58+5:30

मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या ३० युवकांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे वाशिम जिल्हा व्यवस्थापक गजानन शेंडे यांनी दिली. 

30 trainees get employment! | ३० प्रशिक्षणार्थींना मिळाला रोजगार !

३० प्रशिक्षणार्थींना मिळाला रोजगार !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत सन २०१६-१७ या वित्तीय मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या ३० युवकांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे वाशिम जिल्हा व्यवस्थापक गजानन शेंडे यांनी दिली. 
यावर्षीदेखील युवक-युवतींना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत सन २०१७-१८ या वित्तीय वर्षात इतर मागासवर्गीय प्रवर्गातील २०० युवक व युवतींना ह्यसीपेटह्ण औरंगाबाद या प्रशिक्षण संस्थेत, सहाय्यक मशिन चालकाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार  आहे. ह्यसीपेटह्ण ही संस्था भारत सरकारचा उपक्रम असून त्याद्वारे प्लॅस्बीक इंजिनियरिंग व तंत्रज्ञानावर माहिती व प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यात येते. महामंडळाचे जिल्हा कार्यालयाकडून इतर मागासवर्गीय प्रवर्गातील इच्छूक युवक व युवतींकडून अर्ज मागविण्यात येत आहे. आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याचा शेवटचा ३० जून २०१७ अशी आहे. प्रशिक्षणाचा कालावधी ३ महिन्यांचा आहे. जिल्हा कार्यालयामार्फत पाठविण्यात आलेल्या अर्जानुुसार पात्र लाभार्थी निवड प्रशिक्षण संस्थेकडून मुलाखत घेवून करण्यात येईल. प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना नियमानुसार दरमहा १ हजार प्रशिक्षणार्थी शुल्क देण्यात येईल. इच्छूक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्य्वस्थापक गजानन शेंडे यांनी केले.

Web Title: 30 trainees get employment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.