जिल्ह्यात ग्रामसेवकांची ३० पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:28 AM2021-07-15T04:28:02+5:302021-07-15T04:28:02+5:30
००० मोबदला देण्याची धरणग्रस्तांची मागणी वाशिम : रिसोड तालुक्यातील धरणांकरिता जमीन संपादित केलेले शेतकरी अद्याप मोबदल्यापासून वंचित आहेत. ...
०००
मोबदला देण्याची धरणग्रस्तांची मागणी
वाशिम : रिसोड तालुक्यातील धरणांकरिता जमीन संपादित केलेले शेतकरी अद्याप मोबदल्यापासून वंचित आहेत. त्यांना तत्काळ मोबदला देण्याची मागणी धरणग्रस्तांनी बुधवारी जलसंधारण विभागाकडे केली आहे.
०००००००००
पैनगंगा नदीच्या पुलावर खड्डे
कायम
वाशिम : तोंडगाव येथून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या पैनगंगा नदीच्या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे बुजविण्याची मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.
०००
गुडमॉर्निंग पथक पुन्हा गायब
वाशिम : रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, मानोरा तालुक्यातील गावांमध्ये भेटी देत उघड्यावर शाैचास जाणाऱ्या लोकांचा शोध गुडमॉर्निंग पथकाच्यावतीने घेतला जात होता. कोरोनाकाळात कारवाया ठप्प होत्या. दुसरी लाट ओसरत असतानाही ग्रामीण भागात गुडमॉर्निंग पथक सक्रिय झाले नसल्याचे दिसून येते.