३०० विद्यार्थ्यांनी बनविले ९०० सीड बॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 04:39 PM2019-08-01T16:39:41+5:302019-08-01T16:39:47+5:30

वृक्षारोपण व सीडबॉलचा  प्रशिकक्षण वर्ग गुरूवारी स्थानिक विद्यासागर गुरुकुल इंग्लिश स्कुल, येथे पार पडले असून, यावेळी ३०० विद्यार्थ्यांनी ९०० सीड बॉल बनविले.

300 Students made 900 Seed Ball | ३०० विद्यार्थ्यांनी बनविले ९०० सीड बॉल

३०० विद्यार्थ्यांनी बनविले ९०० सीड बॉल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मी वाशिमकर ग्रुपद्वारे वाशिमला ग्रीन सीटी बनविण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या वृक्षारोपण व सीडबॉलचा  प्रशिकक्षण वर्ग गुरूवारी स्थानिक विद्यासागर गुरुकुल इंग्लिश स्कुल, येथे पार पडले असून, यावेळी ३०० विद्यार्थ्यांनी ९०० सीड बॉल बनविले.
मी वाशिमकर ग्रूपच्यावतीने वाशिम शहरात वृक्षारोपण मोहिम राबविली जात आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना सीडबॉल बनविण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. गुरूवारी आयोजित सीड बॉल प्रशिक्षणात एकूण ३०० विद्यार्थी सहभागी झाले होते.  एका-एका विद्यार्थ्याने किमान २ ते ३ असे मातीच्या गोळ्यापासून सिड बॉल तयार केले. जवळपास ९०० सीड बॉल तयार झाले आहेत. हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मी वाशिमकर ग्रुपच्या सर्व सदस्यांसह शाळेतील शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Web Title: 300 Students made 900 Seed Ball

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.